गरमागरम वाफाळत्या चहामध्ये कुरकुरीत खारी बुडवून खाण्याची मजा काही औरच असते. आपल्याला सगळ्यांनाच ही कुरकुरीत, खुसखुशीत खारी खाण्याचा मोह आवरत नाही. 'जगात भारी चहा सोबत खारी' असं म्हटलं जात ते काय उगाच नाही. कित्येकजण सकाळचा आणि संध्याकाळचा नाश्ता म्हणून चहा खारी आवडीने खातात. चहासोबत आपण बिस्कीट, टोस्ट, कुकीज, नानकटाई असे अनेक पदार्थ खात असलो तरी खारीचा एक वेगळाच मान आहे. मस्का खारी, जिरा खारी, टोमॅटो फ्लेवर्ड खारी असे खारीचे अनेक प्रकार बाजारांत सहज उपलब्ध होतात. या कुरकुरीत खारी सारखे आवरण असलेले पॅटिस बाजारात तयार मिळतात. हे पॅटीससुद्धा आपण पेट भरके आवडीने खातो. बाजारांत मिळणारे हे पॅटिस आपण घरीसुद्धा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकतो. चिली चीज कॉर्न खारी बनवण्यासाठी साहित्य काय लागते आणि बनवण्याची कृती काय आहे समजून घेऊयात(Chilli Cheese Corn Khari Recipr : New Twist To The Usual Khari).
burrpet_या इंस्टाग्राम पेजवरून चिली चीज कॉर्न खारी कशी बनवायची याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
साहित्य -
१. खारी - ६ ते ७
२. चीज - २ टेबलस्पून
३. मक्याचे दाणे - १ टेबलस्पून (उकळवून घेतलेले)
४. मिरची - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
५. बेसिल पूड - चिमूटभर
६. ओरेगॅनो - १/२ टेबलस्पून
७. चिली फ्लेक्स - १/२ टेबलस्पून
८. काळीमिरी पूड - चिमूटभर
कृती -
१. एका बाऊल मध्ये चीज, मक्याचे दाणे, मिरची, बेसिल पूड, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, काळीमिरी पूड हे सर्व एकत्रित करून स्टफिंग तयार करून घ्यावे.
२. काटा चमच्याच्या मदतीने खारीचा मध्यभाग हलकेच फोडून घ्या.
३. खारीचा मध्यभाग फोडलेल्या ठिकाणी वरील स्टफिंग भरून घ्या.
४. चीज संपूर्णपणे वितळेपर्यंत या स्टफ केलेल्या खारी मायक्रोव्हेव मध्ये बेक्ड करून घ्या.
५. चिली चीज कॉर्न खारी खाण्यासाठी टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करू शकता.
चिली चीज कॉर्न खारी खाण्यासाठी तयार आहे.