नेहमीच मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. पण जिभेला मात्र काहीतरी चवदार कायमच पाहिजे असते. आता वाटणघाटन न करता जर चमचमीत- खमंग असं काहीतरी करायचं असेल, तर त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. पण नेमकी तिथेच अडचण होते. कारण आपल्याकडे पुरेसा वेळ नसल्याने झटपट स्वयंपाक करायचा असतो. असं खमंग चवीचं काहीतरी चटकन करता यावं आणि ते ही रोज, असं वाटत असेल तर ही चिली पेस्ट किंवा मिरचीची चटणी किंवा मिरचीचं वाटण घरी करून ठेवा (Chilli paste for snacks). प्रत्येक भाजीत किंवा वरणामध्ये एखादा चमचा चिली पेस्ट घातली तरी त्या भाजीला बघा कशी झणझणीत- खमंग चव येईल. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी ही रेसिपी शेअर केली आहे.(Cooking tips for tasty sabji)
चिली पेस्ट किंवा मिरची मसाला तयार करण्यासाठी साहित्य
अर्धा कप चिली फ्लेक्स. घरच्या घरी चिली फ्लेक्स तयार करण्यासाठी वाळलेल्या लाल मिरच्या मिक्सर मधून काढून घ्या किंवा फक्त त्याच्या बिया वापरा.
अर्धा कप काश्मिरी मिरची पावडर. यामुळे चिली पेस्टला छान रंग येतो.
५ टेबलस्पून लसूण पेस्ट
२ टेबलस्पून आल्याची पेस्ट
सालांसह करा लिंबाची चटपटीत झटपट चटणी, महिनाभर टिकेल- फायदेही भरपूर
दिड टेबलस्पून साखर
२ टेबलस्पून तीळ
२ टेबलस्पून सोया सॉस
२ कप तेल
आणि चवीनुसार मीठ
चिली पेस्ट किंवा मिरचीचं वाटण तयार करून ठेवण्याची रेसिपी
१. सगळ्यात आधी चिली फ्लेक्स, मिरची पावडर, साखर, तेल, सोया सॉस, मीठ हे सगळं साहित्य एका भांड्यात एकत्र करून घ्या.
२. त्यावेळीच कढई गॅसवर तापायला ठेवून द्या. कढई तापली की त्यात तेल टाका.
बूट ओलसर राहिल्याने कुबट वास येतो? ३ उपाय, बुटांमधली दुर्गंधी होईल गायब
३. तेल तापलं आणि त्याला थोडी उकळी येऊ लागली की गॅस बंद करा. आता तापलेलं तेल आपण काढून ठेवलेल्या मिश्रणात हळू- हळू ओता.
४. मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका काचेच्या बरणीत भरून ठेवा. अगदी महिनाभर तरी ही पेस्ट चांगली राहील.
५. चिली पेस्ट जास्त दिवस टिकावी, म्हणून आपण त्यात जास्त तेल टाकतो. पण तुम्हाला जेव्हा ती वापरायची असेल, तेव्हा वरचं तेल बाजूला काढून टाकू शकता.