जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण पापड, चटणी, लोणचे घेतोच. हे पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात. आंबट - गोड - तिखट चवीचे हे लोणचं घरातील प्रत्येक सदस्याला आवडते. लोणचे अनेक प्रकारचे बनवले जाते. आंबा, लिंबू, मिरची, हे लोणचे फार फेमस आहे. ज्यात मिरचीचं लोणचं हे देखील लोकं आवडीने खातात.
मिरची ही आधीच झणझणीत तिखट असते. त्यात मसाले मिसळून त्याची चव आणखी वाढवली जाते. मिरचीचे लोणचे बाजारात देखील मिळते. पण त्याची चव काहींना आवडते तर, काहींना नाही. अशावेळी आपण घरच्या घरी चमचमीत मिरचीचे लोणचे बनवू शकता. कमी साहित्यात कमी वेळात ही रेसिपी रेडी होते(Chilli Pickle Recipe (Hari Mirch ka Achar).
पीठ -मीठ -पाणी आणि ५ मिनिटात करा जाळीदार घावन, मऊ लुसलुशीत घावनांची मजाच न्यारी..
मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य
मिरची
मेथी दाणे
काळे तीळ
ना पीठ मळायची झंझट ना पोळ्या लाटायची, करा गव्हाच्या पिठाचे झटपट धिरडे! चपातीला उत्तम पर्याय
बडीशेप
हिंग
हळद
मोहरीची डाळ
ओवा
मीठ
लाल तिखट
आमचूर पावडर
अशा पद्धतीने बनवा मिरचीचं चमचमीत लोणचं
सर्वप्रथम, मिरच्या चांगल्या धुवून वाळवून घ्या. आता मिरचीची देठ मोडून मिरच्या वेगळ्या परातीत ठेवा. व मिरच्यांचे मधोमध काप करून घ्या. एकीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा, त्यात मेथी दाणे व काळे तीळ घालून भाजून घ्या. भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता पॅनमध्ये बडीशेप भाजून घ्या, भाजल्यानंतर बडीशेप मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. व त्याची पावडर तयार करा.
आता त्याच पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात अर्धा चमचा हिंग, एक चमचा हळद, मोहरीची डाळ, व ओवा घालून तेलात मिक्स करा. आता त्यात भाजलेले मेथी दाणे, काळे तीळ, बडीशेप पावडर, मीठ, लाल तिखट पावडर, आमचूर पावडर घालून तेलात मिक्स करा.
शाळेबाहेर मिळणारी वाळवून ठेवलेली कुरकुरीत मसाला कैरी आठवते? यंदा करुन पाहा कैरीची सुपारी घरीच..
तयार मिश्रण काप केलेल्या मिरच्यांमध्ये मिक्स करा. आता त्यावर झाकण ठेवा. रात्रभर किंवा ८ तासांसाठी झाकून ठेवा. ज्यामुळे मिरच्यांमध्ये मसाले चांगले मिक्स होतील. हे तयार मिरच्यांचं लोणचं एका हवाबंद डब्यात किंवा भरणीमध्ये भरा व त्यात गरम करून थंड केलेलं तेल मिसळून डबा बंद करा. अशा प्रकारे मिरच्यांचे चमचमीत लोणचं खाण्यासाठी रेडी.