Join us  

फोडणीचा भात तर नेहमीचाच, आता फक्त १० मिनिटात करा शिळ्या भाताचा चमचमीत फ्राईड राइस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 1:08 PM

भात उरल्यावर आपण त्याला नेहमीच फोडणी घालतो. पण या भाताला जर चायनीज तडका दिला तर मात्र अवघ्या १० मिनिटांत चमचमीत फ्राईड राईस तयार होऊ शकतो.

ठळक मुद्देगाजर, कांद्याची पात या गोष्टी प्रत्येक वेळी बाजारात मिळतातच असे नाही. त्यामुळे या दोन गोष्टी वगळून जरी या रेसिपीनुसार फ्राईड राईस बनवला तरी तो चांगलाच लागतो.

भात हा बहुतेक जणांचा आवडीचा पदार्थ. भातप्रेमी खवय्ये मग दही- भात, साय- भात, वरण- भात, तुप- मीठ आणि भात, भाजी- भात अशी कशासोबतही भाताची मस्त गट्टी जमवतात आणि खाण्याचा आस्वाद घेतात. अनेक घरांमध्ये भात तसा उरतच नाही. पण जर कधी उरला तरी त्याला नेहमीच्याच त्याच त्या पद्धतीने फोडणी देण्यापेक्षा ही एक मस्त आणि चविष्ट रेसिपी ट्राय करून बघा.

 

फ्राईड राईस बनविण्यासाठी लागणारे साहित्यशिजवलेला भात, नुडल्स मसाला, तेल, सोया सॉस, टोमॅटो सॉस, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, कांद्याची पात आणि चवीनुसार मीठ

कृती- सगळ्यात आधी कढईत तेल टाका आणि ते जरा गरम होऊ द्या.- तेल तापले की त्यामध्ये बारीक चिरलेली पत्ताकोबी, सिमला मिरची आणि गाजर टाका.- सिमला मिरची, गाजर आणि पत्ताकाेबी एखादा मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि किसलेले अद्रक टाका.

- हे मिश्रण नीट हलवून घ्या आणि पुन्हा एखादा मिनिट परतू द्या. - आता यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात थोडीशी टाका.- यानंतर या मिश्रणात भात केवढा आहे, ते पाहून बाजारात विकत मिळणारा नुडल्स मसाला टाका. फ्राईड राईस मसाल्यापेक्षा नुडल्स मसाला टाकला तर भात अधिक टेस्टी होतो.- यामध्ये एक टेबल स्पून टोमॅटो सॉस आणि अर्धा टेबल स्पून सोया सॉस टाका. - हे मिश्रण एकत्रित केल्यानंतर यामध्ये भात टाका आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाका. 

- एक- दोन मिनिटे भात चांगला परतू द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि भातावर बारीक चिरलेली कांद्याची पात टाका. कढईवर अर्धा मिनिट झाकण ठेवून द्या.- काही मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवल्यामुळे भात चांगला सेट होऊन अधिक रूचकर लागतो. तसेच सेट होण्यासाठी थोडा वेळ मिळाल्यामुळे कांद्याच्या पातीचा मस्त सुवास येऊ लागतो. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीचीन