Join us  

चिनी फळाची भारतात जोरदार चर्चा, असे ' त्या ' फळामध्ये खास काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2022 3:04 PM

Persimmon China Fruit भारतीय बाजारपेठेत चिनी फळाची चांगलीच चर्चा होत आहे. आम्रफळ असे त्या फळाचे नाव असून, इंग्रजीत त्याला पर्सिमॉन असे म्हणतात.

हेल्दी राहण्यासाठी आपण अनेक फळ भाज्यांचे सेवन करतो. जे आरोग्यासाठी पौष्टिक आणि उत्तम मानले जातात. बाजारात अनेक प्रकारचे फळे मिळतात. काही भारतात उगवणारे फळे असतात. तर काही विदेशी फळे असतात. फळांमुळे अनेक जीवघेण्या आजारांचा धोका कमी होतो. सध्या भारतीय बाजारपेठेत एका फळाची चांगलीच चर्चा होत आहे. आम्रफळ असे त्या फळाचे नाव असून, इंग्रजीत त्याला पर्सिमॉन असे म्हणतात. हे चीनचे फळ असले तरी त्याच्या फायद्यांमुळे भारतीय बाजारपेठेत त्याची लोकप्रियता वाढत आहे. चला तर मग जाणून घेऊया याचे फायदे.

व्हिटॅमिनने भरपूर

आम्रफळ व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहे, हे फळ निरोगी डोळे राखण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते. याशिवाय व्हिटॅमिन ई, बी 1, बी 2, बी 6 फोलेट, पोटॅशियम, आयरन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे उत्तम स्रोत आढळून येते. हे नैसर्गिक मल्टीविटामिन आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर आपल्याला वाढत्या लठ्ठपणाची समस्या भेडसावत असेल तर, आम्रफळ वजन कमी करण्यास मदतगार आहे. हे फळ खाल्ल्यानंतर भूक कमी लागते जेणेकरून आपण जास्त खाण्यापासून वाचतो. यासोबतच पचनक्रिया देखील सुधारते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

हे फळ हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि क्वेर्सेटिन हृदयाला निरोगी ठेवतात. या फळाचे सेवन केल्यास हृदयाशी संबंधित इतर अनेक आजारांचा धोका कमी होतो. 

दृष्टी सुधारते

आम्रफळ हा अनेक जीवनसत्त्वांचा खजिना आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर ठरते. याशिवाय, हे व्हिटॅमिन सी, ई, के, बी1, बी2 आणि व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम, तांबे, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीजचा चांगला स्रोत आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती मजबूत. बदलत्या ऋतूमध्ये अनेक संसर्गजन्य आजारांपासून ते तुमचे संरक्षण करू शकते.

टॅग्स :अन्नफळेचीन