दिवाळीच्या दिवसांत फराळाच्या वेगवेगळ्या पदार्थांची देवाणघेवाण होतेच. आता पुर्वीएवढं त्याचं स्वरुप मोठं राहिलेलं नाही. कारण खाण्यापिण्याची पथ्ये प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला असतातच. त्यामुळे हल्ली एखादा ठराविक पदार्थच आणि ते ही गोड पदार्थच दिवाळी म्हणून जवळच्या लोकांना, मित्रमंडळींना, नातलगांना दिला जातो (Diwali special mithai) अशावेळी विकतची कोणतीही मिठाई आणण्यापेक्षा किंवा सोनपापडी, मोतीचूर लाडू, बुंदी लाडू असे काही तेच ते प्रकार देण्यापेक्षा यंदा चॉकलेट- खजूर मिठाई देऊन पाहा (chocolate dates mithai for Diwali). चाॅकलेट खजूर मिठाई करण्याची रेसिपी अतिशय सोपी असून ही मिठाई अवघ्या अर्ध्या तासात तयार होते. (How to make Chocolate Dates Mithai?)
चाॅकलेट खजूर मिठाई करण्याची रेसिपी
साहित्य
१५ ते २० खजूर
अर्धी वाटी नट बटर
दिवाळीत दिव्यांसारखा लख्खं चमकेल तुमचा चेहरा! ४ सोप्या स्टेप्स, घरीच करा फेशियल- दिसाल सुंदर
एक वाटी डार्क चॉकलेट
पाव वाटी सुकामेव्याचे तुकडे
पाव वाटी किसलेला सुकामेवा
कृती
सगळ्यात आधी खजूर मधोमध कापा आणि त्याच्यातल्या बिया बाहेर काढून घ्या. कापताना खजूर पुर्णपणे कापून त्याचे दोन तुकडे करू नका.
आता खजूराच्या ज्या भागात बिया असतात, त्या भागात नट बटर भरा आणि त्यात तुमच्या आवडीच्या कोणत्याही सुकामेव्याचा एक छोटासा तुकडा टाका. अशा पद्धतीने सगळे खजूर भरून घ्या.
कोणत्याही ड्रेसवर, साडीवर शोभून दिसतील असे मोत्याचे कानातले! बघताक्षणीच आवडणारे ८ सुंदर डिझाईन्स
त्यानंतर डार्क चॉकलेट थोडं वितळवून घ्या. नट बटर भरलेले खजूर डार्क चॉकलेटमध्ये व्यवस्थित बुडवून घ्या. चाॅकलेट खजूरला सगळ्या बाजुंनी व्यवस्थित लागलं जाईल याची काळजी घ्या.
एका ताटलीमध्ये बटरपेपर पसरवून ठेवा आणि त्यावर डार्क चॉकलेटमध्ये बुडवलेले खजूर ठेवा. हे खजूर सेट होण्यासाठी २० ते २५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून द्या. त्यानंतर ही बर्फी खाण्यासाठी तयार... लहान मुलांसकट घरातल्या मोठ्या मंडळींनाही खूप आवडतील.