Join us  

विकतचे चॉकलेट देण्यात काय मजा? द्या पर्सनल प्यारवाला टच, करा चॉकलेट हनी केक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2022 12:56 PM

Honey cake recipe: कशाला हवंय विकतचं चॉकलेट.. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी स्वत:च्या हातानेच करूया ना काहीतरी... एकच चॉकलेट देण्यापेक्षा अख्खा हनी केक त्याच्यासमोर ठेवून त्याला जबरदस्त सरप्राईज देऊ या... 

ठळक मुद्देया रेसिपीने तयार केलेला चॉकलेट केक जर नवऱ्याला, बॉयफ्रेंडला दिला तर तो नक्कीच खुश होऊन जाणार बघा..

दुकानातून विकत आणून दिलेलं चॉकलेट वेगळं आणि स्वत:च्या हाताने काहीतरी चॉकलेट स्पेशल बनवणं वेगळं.. पहिल्या कृतीत तुमचं खूप प्रेम असलं तरी एकप्रकारची फॉर्मेलिटी दिसून येते. त्याउलट जर तुम्ही चॉकलेटचा एखादा पदार्थ खास तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी मेहनत घेऊन तयार केला तर त्याचा आनंद नक्कीच वेगळा असतो आणि त्यात तुमचा पर्सनल टच दिसतो... म्हणूनच तर औरंगाबादच्या शेफ राजश्री अग्रवाल यांनी व्हॅलेंटाईन्स स्पेशल चॉकलेट केक रेसिपी शेअर केली आहे. या रेसिपीने तयार केलेला चॉकलेट केक जर नवऱ्याला, बॉयफ्रेंडला दिला तर तो नक्कीच खुश होऊन जाणार बघा..

 

हनी केक रेसिपी (honey cake recipe)- सगळ्यात आधी केक टीनचं बटर आणि मैदा लावून डस्टिंग करून घ्या. - पाऊण कप पिठीसाखर, अर्धा कप तेल, अर्धा कप दही एका बाऊलमध्ये घेऊन चांगलं मिक्स करून घ्या. - आता दुसऱ्या बाऊलमध्ये दिड कप मैदा चाळून घ्या. त्यात अर्धा टी स्पून बेकिंग सोडा, १ टी स्पून बेकिंग पावडर, अर्धा टी स्पून मीठ टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर या मिश्रणात पिठीसाखर, तेल, दही यांचं केलेलं मिश्रणही टाका. दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या.- आता त्यात अर्धा कप दूध टाका. मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या. गरज पडली तर आणखी दूध टाका.- हे मिश्रण आता केक टीनमध्ये टाका. १० मिनिट कुकर प्री- हिट करा आणि त्यानंतरच त्यात केक टिन ठेवा. ४० ते ४५ मिनिटे तो बेक होऊ द्या.

 

हनी सिरप (honey syrup)- केकसाठी आपल्याला हनी सिरप लागणार आहे. त्यासाठी एका कढईत अर्धा कप पाणी, चार टेबलस्पून साखर घ्या. साखर विरघळल्यावर गॅस बंद करा. साखरेचा पाक थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात ४ टेबलस्पून मध टाका. व्यवस्थित मिक्स केलं की हनी सिरप झालं तयार.- दुसऱ्या कढईत अर्धा कप मिक्स फ्रुट जॅम, २ टेबलस्पून मध टाका. जॅम पातळ झाला की गॅस बंद करा. हे आपल्या केकचं आईसिंग असणार आहे.

 

असं करा केकचं आईसिंग (how to do icing)बेक झालेला केक रूम टेम्परेचरवर आला की केक टीनमधून बाहेर काढा. टुथपिक किंवा फोक वापरून तो प्रिक करा. त्यावर सुगर सिरप लावा.- केकचे चौकोनी तुकडे करून घ्या. त्यावर आपण तयार केलेलं जॅम सिरप लावा. वरतून किसलेलं खोबरं टाका. हनी केक झाला तयार.. 

myvegfare.com

vegrecipesofindia.com

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.