Join us

भाज्या चिरायला 'चॉपिंग बोर्ड' वापरता? तज्ज्ञ सांगतात, टॉयलेटपेक्षा घातक बॅक्टेरियांच्या संसर्गाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 17:55 IST

Chopping Board Has More Bacteria Than A Toilet Seat : हे बॅक्टेरिया टॉयलेट सिटवरील बॅक्टेरियाजच्या तुलनेत अधिक स्टाँग असतात म्हणून चॉपिंग बोर्डची नियमित साफ-सफाई करायला हवी. 

किचन स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं. काही हा घराचा असा भाग असतो ज्यावर संपूर्ण कुटूंबाचे आरोग्य अवलंबून असते. किचनच्या भांड्याची साफसफाई करणं फार गरजेचं असतं. जर तुम्हाला कोणत्याही भांड्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही ते धुवून घ्या. (Cooking Hacks) याच पद्धतीनं भाजी कापण्याचा चॉपबोर्ड स्वच्छ असणं फार महत्वाचे आहे. कारण तो नेहमीच वापरात असतो. इंटरनेटवर चॉपिंग बोर्डबद्दल एक माहिती पसरली आहे ती म्हणजे चॉपिंग बोर्डवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरियाज असतात.  याबाबत हेल्थ एक्सपर्ट्स काय सांगतात ते समजून घेऊ. (Chopping Board Has More Bacteria Than A Toilet Seat Know From Health Experts And Cleaning Process Research)

मल्टीडिस्प्लिनरी  डिजिटल पब्लिशिंग इंस्टिट्यूटनुसार अनेक खादयपदार्थ चिरण्यासाठी चॉपिंग बोर्डचा वापर केला जातो. कटींग बोर्ड धुतल्यानंतर  लाकडात ओलावा राहण्याची शक्यता असते. यामळे लाकडाचा पृष्ठभाग स्वच्छ राहतो आणि जिवाणू बोर्डच्या आत अडकून राहतात. ओलावा बॅक्टिरेयाच्या वाढीसाठी पुरक ठरतो. त्यात बॅक्टेरियाज अडकून रातात. प्लास्टीक तसेच लाकडी कटींग बोर्डच्या बाबतीतही हे लागू होते. 

चॉपिंग बोर्डवर बॅक्टेरियाज वेगानं पसरतात. डायटिशियन सुहानी सेठ अग्रवाल सांगतात की ई. कोली आणि साल्मोनेला नावाचे हानीकारक बॅक्टेरिया येऊ शकतात. शौचायलाच्या सिटशी चॉपिंगची तुलना करणं थोडं जास्त होऊ शकतं पण कारण हे लाकडापासून तयार झालेले असतात.

केळी आणल्यानंतर एका दिवसात नरम- काळी पडतात? ३ ट्रिक्स, आठवडाभर ताजी राहतील केळी

कंसल्टेंट डायटिशियन कनिका मल्होत्रा यांच्यामते, चॉपिंग बोर्डमध्ये टॉयलेट सी च्या तुलनेत अधिक बॅक्टेरिया असतात. कारण बॅक्टिरिया बोर्डच्या परिसरात फसू शकतात. हे बॅक्टेरिया टॉयलेट सिटवरील बॅक्टेरियाजच्या तुलनेत अधिक स्टाँग असतात म्हणून चॉपिंग बोर्डची नियमित साफ-सफाई करायला हवी. 

बॅक्टेरियांचे संक्रमण कमी करण्यासाठी तुम्ही चॉपिंग बोर्डचा काळजीपूर्वक वापर करू शकता. वापरानंतर गरम पाणी आणि डिश वॉशनं व्यवस्थित साफ करून घ्या. साफ केल्यानंतर व्हिनेगर, लिंबाचा रस वापरू शकता. बोर्ड पूर्णपणे  हवेत सुकवायला ठेवा. कारण मॉईश्चरमुळे बॅक्टेरियाज लवकर पसरतात. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स