Join us  

कुकरमध्येही करता येतो अगदी विकतसारखा चोको लाव्हा केक.. पाहा ख्रिसमस स्पेशल रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 4:22 PM

Choco Lava Cake Recipe Without Oven: बाहेर मिळणारे ब्रॅण्डेड कंपन्यांचे चोको लाव्हा केक जसे असतात, अगदी तसेच आपण घरीही करू शकतो. आणि ते ही कुकरमध्ये.. बघा ही खास रेसिपी

ठळक मुद्देइतर केकच्या तुलनेत या केकला खूप कमी वेळ लागतो. त्यामुळे यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने हा मुलांच्या अतिशय आवडीचा केक घरी करून बघा

घरी ओव्हन नाही, मग चोको लाव्हा केक कसा करणार, असा विचार करत असाल तर थांबा आणि ही एक सोपी रेसिपी बघा. बाकीचे केक बेस जसे आपण घरी कुकरमध्ये तयार करतो, अगदी तशाच पद्धतीने चोकोलाव्हा केकही घरी तयार करता येतो. शिवाय इतर केकच्या तुलनेत या केकला खूप कमी वेळ लागतो. त्यामुळे यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने (Christma special) हा मुलांच्या अतिशय आवडीचा केक घरी करून बघा (choco lava cake in pressure cooker).. त्यासाठी घ्या ही एक खास रेसिपी. पदार्थांचं प्रमाण आणि वेळेचं गणित अगदी व्यवस्थित फॉलो केलं तर केकचा बेत मुळीच फसणार नाही.(Choco Lava Cake Recipe Without Oven)

साहित्य२ टीस्पून रुम टेम्परेचर बटर४ टेबलस्पून कोको पावडर

डाएट करायचं ठरवता, पण काही दिवसांतच बारगळून जातं? ३ टिप्स, वेटलॉससाठी होईल फायदाअर्धा कप मैदाअर्धा कप पिठी साखरपाव कप दूध२ डेअरीमिल्क १०४ ग्रॅम.अर्धा टीस्पून बेकिंग पावडर.

 

कृती१. सगळ्यात आधी ॲल्यूमिनियम फॉईल वापरून केक मोल्ड तयार करून घ्या. त्याला बटर लावून घ्या.

World Saree Day: साडीचं लावण्य! १० प्रसिद्ध भारतीय साड्या, बघा यापैकी तुमच्या वॉर्डरोबमध्ये किती आहेत

२. गॅसवर प्रेशर कुकर तापायला ठेवा. त्यात अर्धी वाटी मीठ टाकून व्यवस्थित पसरवून घ्या. कुकरमध्ये एखादे उंच स्टॅण्ड किंवा वाटी ठेवा आणि त्यावर एक प्लेट ठेवा. या प्लेटमध्ये आपण नंतर केक मोल्ड ठेवणार आहोत. आता कुकरची शिटी आणि वायर काढून घ्या, कुकरला झाकण लावा आणि ते १० मिनिटांसाठी मध्यम ते मोठ्या आचेवर प्री हिटसाठी ठेवा.

 

३. आता एका बाऊलमध्ये मैदा, कोकोपावडर, पिठी साखर, बेकिंग पावडर गाळून घ्या. त्यानंतर त्यात दूध टाकून मिश्रण कालवून घ्या.

थंडीमुळे घसा खवखवणे, सर्दी- खोकला, श्वसनाचा त्रास वाढला? पूजा माखिजा सांगतात १ सोपा उपाय

४. डेअरिमिल्क कॅडबरी वितळवून घ्या, त्यात बटर टाका आणि ते आपल्या केकच्या बॅटरमध्ये टाका.

५. आता हे मिश्रण तयार केलेल्या केक मोल्डमध्ये भरा. आणि ते प्रीहीटसाठी ठेवलेल्या कुकरमध्ये ८ ते १२ मिनिटांसाठी बेक करायला ठेवा. यावेळी गॅस मध्यम ते मोठा यामधला असावा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.नाताळ