Join us  

Christmas 2021: मोजक्या साहित्यात ५ मिनिटात बनवा 'या' ५ प्रकारचे स्वादीष्ट, मऊ कप केक्स; ही घ्या  रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 5:50 PM

Christmas 2021 : नेहमीच बाहेरून केक्स विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी कमीत कमी साहित्यात भरपूर केक्स तयार करू शकता.

ख्रिसमसचा (Christmas 2021) सण जसजसा जवळ येतो तसतसं सुट्ट्या, आनंद, मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जाणं, कुटुंबासोबत पार्टी असं वातावरण सगळ्यांच्याच घरी तयार होतं. ख्रिसमस किंवा न्यू इयर सेलिब्रेशनसाठी केक्स, पेस्ट्रीज दुकानातून आणले जातात. नेहमीच बाहेरून केक्स विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी कमीत कमी साहित्यात भरपूर केक्स तयार करू शकता. या लेखात तुम्हाला झपटपट होणाऱ्या काही केक रेसेपीज शेअर करणार आहोत. (Christmas Special Easy, instant cup cake recipes) जेणेकरून तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील याशिवाय सण आनंदानं साजरा करू शकाल.

साहित्य

½ कप मैदा (120 ग्राम), ½ कप साखर, 1/8 टी स्पून बेकिंग सोडा, ½ टी स्पून बेकिंग सोडा, ८५ ग्राम बटर , 2 अंड्यांचा पांढरा भाग, ¼ कप दही, ¼ कप दूध, ¼ टी स्पून मीठ, 1 ½ टी स्पून वेनिला एसेंस.

कृती

- सगळ्यात आधी ओवन  180 डिग्रीला प्रीहीट करून घ्या. मैद्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ एकत्र करून दोनदा चाळून घ्या. मैद्यात पीठी साखर मिसळून बाजूला ठेवा.

- एका वेगळ्या भांड्यात अंड्याचा पांढरा भाग फेटून घ्या. वितळलेले बटर मिसळा आणि पुन्हा फेटून घ्या. यात दही आणि दूध मिसळा. पिठाचे मिश्रण हळूहळू मिसळा आणि एकदा चांगले फेटून घ्या. कपकेक ट्रेमध्ये ठेवा आणि केकचे मिश्रण भरा.  

- भांडं थोडं रिकामं ठेवा. प्रिहीट केलेल्या ओव्हनमध्ये ठेवा आणि 18-20 मिनिटे बेक करा. नंतर टूथपिकने तपासा जर ते स्वच्छ बाहेर आले तर कपकेक शिजला नाही. नंतर थोडा वेळ बेक करा. ओव्हनमधून काढल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही केक खाऊ शकता.  (Instant cup cake recipes)

1) व्हेनिला कप केक

२) चार प्रकारचे सोपे कप केक्स

३) बिना मैद्याचा कप केक

४)  चॉकलेट कप केक

५) मग केक

टॅग्स :अन्नपाककृतीनाताळ