Lokmat Sakhi >Food > Christmas 2024: चहाच्या कपात करा सुपरस्पाँजी कप केक- पाहा केकची सगळ्यात सोपी रेसिपी

Christmas 2024: चहाच्या कपात करा सुपरस्पाँजी कप केक- पाहा केकची सगळ्यात सोपी रेसिपी

Christmas Celebration 2024: ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी घरच्याघरी केक तयार करायचा असेल तर ही एक सगळ्यात सोपी रेसिपी पाहून घ्या..(Most simple recipe of making cup cake without using microwave)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 16:16 IST2024-12-24T15:08:26+5:302024-12-24T16:16:21+5:30

Christmas Celebration 2024: ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी घरच्याघरी केक तयार करायचा असेल तर ही एक सगळ्यात सोपी रेसिपी पाहून घ्या..(Most simple recipe of making cup cake without using microwave)

Christmas Celebration 2024, Most simple recipe of making cup cake, how to make cup cake at home in kadhai or cooker | Christmas 2024: चहाच्या कपात करा सुपरस्पाँजी कप केक- पाहा केकची सगळ्यात सोपी रेसिपी

Christmas 2024: चहाच्या कपात करा सुपरस्पाँजी कप केक- पाहा केकची सगळ्यात सोपी रेसिपी

Highlightsहे कप तुम्ही मायक्रोवेव्ह मध्येही ठेवू शकता किंवा मग मायक्रोवेव्ह नसेल तर कुकर किंवा कढईमध्येही मध्यम आचेवर २० ते २५ मिनिटांसाठी ठेवू शकता. 

घरच्याघरी केक तयार करणं हे अनेकजणींना महाकठीण काम वाटतं. कारण त्यातल्या पदार्थांचं प्रमाण थोडं जरी कमी-जास्त झालं किंवा मग बेक करताना काही हुकलं तरी लगेच केक बिघडतो. त्यामुळे कप केक असो किंवा कोणताही मोठा केक असो त्याचं प्रमाण अजिबात चुकू नये हा केक तयार करण्याचा पहिला नियम. आता जर ख्रिसमसच्या निमित्ताने बच्चे कंपनीसाठी घरच्याघरी केक तयार करण्याचा तुमचा विचार असेल (Most simple recipe of making cup cake) तर खूप काही तयारी न करता चहासाठी वापरण्यात येणाऱ्या युज ॲण्ड थ्रो कपमध्ये केक कसा तयार करायचा ते पाहूया.. (how to make cup cake at home without using microwave?)

कप केक करण्याची सोपी रेसिपी

 

साहित्य

१ टीस्पून कॉफी पावडर

२ टेबलस्पून दूध 

१ टीस्पून व्हिनेगर

१ टेबलस्पून तेल

१ कप मैदा

पोट साफ व्हायला रोजच त्रास होतो? 'या' पद्धतीने तूप खा- बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल

अर्धा कप पिठीसाखर

अर्धा कप मिल्क पावडर

१ टीस्पून बेकिंग पावडर

अर्धा टीस्पून बेकिंग सोडा

१ टेबलस्पून कोको पावडर

 

कृती

सगळ्यात आधी एका वाटीत कॉफी पावडर घ्या आणि पाणी टाकून ती पातळ करून घ्या.

त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये दूध घ्या आणि व्हिनेगर, तेल टाकून ते थोडं हलवून घ्या. त्यातच थोडी साखर टाकून सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या.

काळवंडलेली त्वचा चमकदार करणारा ऑरेंज फेसपॅक! संत्रीचे साल फेकून न देता 'असे' वापरून पाहा

आता मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर आणि मिल्क पावडर मोठ्या चाळणीने चाळून घ्या. सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि त्यात दूध टाकून केकचं बॅटर तयार करून घ्या. केकचं बॅटर खूप घट्ट किंवा खूप सैल नको. 

ख्रिसमस पार्टीत हॉट- स्टायलिश दिसण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स, बघा लाल ड्रेसमधले खास लूक

आता तयार केलेलं बॅटर चहा- काॅफी पिण्यासाठी असलेल्या कपमध्ये टाका. हे कप तुम्ही मायक्रोवेव्ह मध्येही ठेवू शकता किंवा मग मायक्रोवेव्ह नसेल तर कुकर किंवा कढईमध्येही मध्यम आचेवर २० ते २५ मिनिटांसाठी ठेवू शकता. 

 

Web Title: Christmas Celebration 2024, Most simple recipe of making cup cake, how to make cup cake at home in kadhai or cooker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.