ख्रिसमस आता काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे त्याची तयारी सुरू झाली असेल आणि एखादा स्पेशल केक ख्रिसमसच्या पार्टीसाठी करण्याचा विचार करत असाल तर ही एक रेसिपी आताच पाहून ठेवा. अगदी विकतसारखा चोकोलाव्हा केक घरी कसा तयार करायचा, याची ही एक सोपी रेसिपी असून त्यासाठी खूप काही तयारी करण्याची गरज नाही (How to make choco lava cake at home). हा केक घरी तयार करून तुम्ही तुमच्या पाहुण्यांना नक्कीच एक छान सरप्राईज देऊ शकता (choco lava cake in just 20 Rupees). कारण हा केक इतका छान होतो की यानंतर तुम्ही विकतचा चोकोलाव्हा केक खाणंच विसरुनच जाल.. (easy and simple recipe of choco lava cake)
साहित्य
१ टेबलस्पून बटर
४ टेबलस्पून कोको पावडर
अर्धा कप मैदा
ड्रेसच्या रंगानुसार लिपस्टिकची शेड कशी निवडायची? बघा ६ टिप्स- दिसाल आणखी सुंदर- आकर्षक
अर्धा कप पिठी साखर
पाव कप दूध
२ डेअरीमिल्क १०४ ग्रॅम
अर्धा टीस्पून बेकिंग पावडर.
कृती
सगळ्यात आधी ॲल्यूमिनियम फॉईल वापरून केक मोल्ड तयार करून घ्या आणि त्याला बटर लावून घ्या.
गॅसवर प्रेशर कुकर तापायला ठेवा. त्यात अर्धी वाटी मीठ टाकून व्यवस्थित पसरवून घ्या. कुकरमध्ये एखादे उंच स्टॅण्ड किंवा वाटी ठेवा आणि त्यावर एक प्लेट ठेवा.
मोठ्या हौशीने भाज्यांचं लोणचं घालता, पण लगेच खराब होतं? ५ टिप्स लक्षात ठेवा- महिनाभर टिकेल लोणचं
कुकरची शिटी आणि वायर काढून घ्या. कुकरला झाकण लावा आणि ते १० मिनिटांसाठी मध्यम ते मोठ्या आचेवर प्री हिटसाठी ठेवा.
आता एका बाऊलमध्ये मैदा, कोकोपावडर, पिठी साखर, बेकिंग पावडर गाळून घ्या. त्यानंतर त्यात दूध टाकून मिश्रण कालवून घ्या.
डेअरिमिल्क कॅडबरी वितळवून घ्या, त्यात बटर टाका आणि ते आपल्या केकच्या बॅटरमध्ये टाका.
पॉपकॉर्न नेहमीच खाता, आता पॉपकॉर्न सूप प्या- ही घ्या कुणाल कपूर यांनी शोधून काढलेली भन्नाट रेसिपी
आता हे मिश्रण तयार केलेल्या केक मोल्डमध्ये भरा आणि ते प्री- हीटसाठी ठेवलेल्या कुकरमध्ये ८ ते १२ मिनिटांसाठी बेक करायला ठेवा. यावेळी गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर असावा.
साधारण १० मिनिटे झाली की एकदा कुकरचे झाकण उघडून केक कितपत बेक झाला हे तपासून पाहा.