हिवाळा सुरू झाला की ख्रिसमसची चाहूल लागते. सध्या सर्वत्र ख्रिसमसचा माहोल तयार झाला आहे. सगळीकडे पेस्ट्री, केक, डेकोरेशन, भेट वस्तूंनी बाजारपेठ भरलं आहे. ख्रिसमसमध्ये केक खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. त्या केकला एक विशिष्ट चव देखील येते. जे इतर बेकरी केकला येत नाही. त्यामध्ये विविध रंगीबेरंगी लज्जतदार केकचे प्रकार आहेत. जे बाजारात सहज उपलब्ध आहेत. मात्र, ख्रिसमस स्पेशल केक आपल्याला घरच्या घरी तयार करायचं असेल, तर मोजक्या घरगुती साहित्यांचा वापर करून आपण हा केक तयार करू शकता.
ख्रिसमस स्पेशल चॉकलेट केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य
1 कप मैदा
1 कप पिठी साखर
½ कप कोको पावडर
1 चमचा बेकिंग पावडर
1 चमचा बेकिंग सोडा
½ चमचा मीठ
½ कप तेल
½ कप गरम पाणी
½ कप दूध
1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
2 चमचे दही
कृती
सर्वप्रथम, ओव्हन 180 डिग्रीवर प्रीहिट करा आणि ट्रे ला व्हेजिटेबल ऑईल लाऊन ठेवा. दुसरीकडे एका भांड्यात मैदा, पिठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ एकत्र करा. त्यात तेल आणि पाणी घालून नीट मिक्स करून ठेवा. वरून दूध आणि व्हॅनिला इसेन्स मिक्स करा.
त्यानंतर सर्वात शेवटी दही मिक्स करा. हे सर्व मिश्रण नीट मिक्स झाल्यावर ट्रे मध्ये पसरवा आणि मग 30-40 मिनिटेपर्यंत ओव्हनमध्ये ठेवा. ४० मिनिटे झाल्यानंतर केक तयार आहे हे टूथपिक घालून तपासून घ्या, शेवटी तयार झाल्यानंतर बाहेर काढून 10 मिनिट तसंच ठेवा. थंड झाल्यानंतर केक ट्रे बाहेर काढा. अशाप्रकारे चॉकलेट केक तयार. यात आपण सजावटीसाठी चोको चिप्स मिक्स करू शकता.