Lokmat Sakhi >Food > सततच्या थकव्यामुळे अंग दुखतं? गव्हाच्या पिठाचा खा १ पौष्टीक लाडू; वाढेल ताकद आणि..

सततच्या थकव्यामुळे अंग दुखतं? गव्हाच्या पिठाचा खा १ पौष्टीक लाडू; वाढेल ताकद आणि..

Churma laddu for healthy diet. Check recipe of Churma Laddu : गुजराथी पद्धतीचा चुरमा लाडू कधी करून पाहिलं आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 08:21 PM2024-08-13T20:21:14+5:302024-08-13T20:22:11+5:30

Churma laddu for healthy diet. Check recipe of Churma Laddu : गुजराथी पद्धतीचा चुरमा लाडू कधी करून पाहिलं आहे का?

Churma laddu for healthy diet. Check recipe of Churma Laddu | सततच्या थकव्यामुळे अंग दुखतं? गव्हाच्या पिठाचा खा १ पौष्टीक लाडू; वाढेल ताकद आणि..

सततच्या थकव्यामुळे अंग दुखतं? गव्हाच्या पिठाचा खा १ पौष्टीक लाडू; वाढेल ताकद आणि..

लाडूचा खवय्यावर्ग तसा मोठा. लाडू अनेक प्रकारचे केले जातात (Food). काहींना शेवचे लाडू तर, काहींना बुंदीचे लाडू आवडतात. ड्रायफ्रुट्सचे लाडूही आरोग्यासाठी पौष्टीक ठरतात. खोबऱ्याचे लाडू खाल्ल्याने हाडं मजबूत होतात (Cooking Tips). पण आपण कधी गव्हाच्या पीठाचे लाडू खाऊन पाहिलं आहे का? ज्याला काही भागात चुरमा लाडूही म्हणतात (Health Tips).

भुकेच्या वेळी इतर काही खाण्यापेक्षा, आपण चुरमा लाडू खाऊ शकता. चुरमा लाडू हे गव्हाच्या पीठापासून केले जातात. जे चवीला भन्नाट होतात. यासह शरीराची ताकद वाढवण्यासही मदत करते. गुजराथी पद्धतीचा लाडू नेमका कसा करावा? महिनाभर हे लाडू टिकावे म्हणून कोणत्या टिप्स फॉलो कराव्या? पाहा(Churma laddu for healthy diet. Check recipe of Churma Laddu).

गुजराथी पद्धतीचा चुरमा लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य


गव्हाचं पीठ

वजन कमी करायचं? आहारातून तेल वगळावं की भात? नक्की काय खाणं बंद केल्यानं वजन घटतं?

तूप

काजू

बदाम

सुकं खोबरं

गुळ

वेलची पूड

मिल्क पावडर

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये ३ कप गव्हाचं पीठ घ्या. नंतर त्यात अर्धा कप रवा घालून मिक्स करा. मग त्यात अर्धा कप गरम केलेलं तूप आणि गरजेनुसार कोमट पाणी घालून हाताने मिक्स करा, आणि कणिक ज्यापद्धतीने आपण मळतो, त्याच पद्धतीने मळून घ्या.

एका कढईत एक कप तूप घालून गरम करण्यासाठी ठेवा. हातामध्ये थोडी कणिक घ्या, व लाडू वळवून घ्या, आणि गरम तुपात सोडून तळून घ्या. तळून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून जाडसर वाटून घ्या, व वाटलेली पावडर एका परातीत काढून घ्या.

छोट्याशा कुंडीत लावा विड्याच्या पानाचा सुंदर वेल, ५ गोष्टी वेल वाढेल झरझर-घरात येईल समृद्

नंतर कढईतल्या तुपात अर्धा कप बारीक चिरलेला बदाम, काजू, सुकं खोबरं घालून भाजून घ्या. भाजलेले ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर तुपात किसलेला गुळ घालून पाक तयार करा. तयार पाक परातीत काढून घ्या. नंतर त्यात तळलेले ड्रायफ्रुट्स, एक कप मिल्क पावडर आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून हाताने साहित्य मिक्स करा.

हाताला थोडे तूप लावून घ्या, व थोडे मिश्रण घेऊन लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे चुरमा लाडू खाण्यासाठी रेडी. हवाबंद डब्यात साठवून ठेवल्यास हे लाडू महिनाभर आरामात टिकतात.

Web Title: Churma laddu for healthy diet. Check recipe of Churma Laddu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.