Lokmat Sakhi >Food > गोड पदार्थाला स्पेशल टेस्ट द्यायचीय? 2 मॅजिक गोष्टींसह संजीव कपूर देतात 'हा' खास सल्ला !

गोड पदार्थाला स्पेशल टेस्ट द्यायचीय? 2 मॅजिक गोष्टींसह संजीव कपूर देतात 'हा' खास सल्ला !

Food and recipe: गोड पदार्थाला आणखी खास बनविण्याची सिक्रेट टिप (secret tips by Sanjeev Kapoor) दिली आहे प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 06:46 PM2022-02-09T18:46:09+5:302022-02-09T18:52:45+5:30

Food and recipe: गोड पदार्थाला आणखी खास बनविण्याची सिक्रेट टिप (secret tips by Sanjeev Kapoor) दिली आहे प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी. 

cinnamon and sugar mixture, perfect topping for any sweet dish, special tips shared by famous Sanjeev Kapoor | गोड पदार्थाला स्पेशल टेस्ट द्यायचीय? 2 मॅजिक गोष्टींसह संजीव कपूर देतात 'हा' खास सल्ला !

गोड पदार्थाला स्पेशल टेस्ट द्यायचीय? 2 मॅजिक गोष्टींसह संजीव कपूर देतात 'हा' खास सल्ला !

Highlightsकोणत्याही गोड पदार्थाची चव अधिक वाढविण्यासाठी किंवा त्याला स्पेशल टच देण्यासाठी तुम्ही या Cinnamon Sugar टॉपिंगचा वापर करू शकता.

आपण नेहमीच वेगवेगळे गोड पदार्थ करतो.. पण काही जणांच्या हातच्या गोड पदार्थांचा गोडवा वेगळाच असतो.. पदार्थ तर लगेच संपून जातो. पण त्याची चव मात्र खाणाऱ्याच्या जीभेवर वर्षानुवर्षे रेंगाळत राहते.. आपली आणि त्यांची रेसिपी यात खूप काही फरक नसतो.. पण असा काही सिक्रेट इनग्रेडियंड त्यांना गवसतो की त्यामुळे त्या पदार्थाची चव कमाल बदलून जाते.. (perfect topping for any sweet dish) अशीच गोड पदार्थाला आणखी खास बनविण्याची सिक्रेट टिप (secret tips by Sanjeev Kapoor) दिली आहे प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी. 

 

संजीव कपूर यांनी एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामला (instagram video) शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कोणत्याही गोड पदार्थाला आणखी स्वादिष्ट, चवदार कसं बनवायचं याचं सिक्रेट सांगितलं आहे. कधीकधी गोड पदार्थ आपल्याला खावे वाटतात, पण त्यांच्या त्याच त्या चवीमुळे आपल्याला ते बोअर होऊ लागतात. असं वाटलं तर संजीव कपूर यांचा सल्ला ऐकून करा त्या पदार्थांवर मस्त टॉपिंग आणि बनवा त्या पदार्थाला आणखी टेस्टी..

 

टॉपिंग बनविण्यासाठी त्यांनी दालचिनी आणि साखर या दोन गोष्टी वापरल्या आहेत. Cinnamon Sugar असं नाव त्यांनी या टॉपिंगला दिलं आहे. Cinnamon Sugar टॉपिंग बनविण्यासाठी आपल्याला १ कप पिठीसाखर आणि १ टेबलस्पून दालचिनी पावडर लागणार आहे. दालचिनी पावडर बनविण्यासाठी सगळ्यात आधी तवा गरम करून त्यावर दालचिनी भाजून घ्या. दालचिनी खूप जास्त भाजू नका. दालचिनी भाजताना गॅस मध्यम ठेवा. दालचिनी भाजून थंड झाली की त्यानंतर ती मिक्सरमधून काढा. दालचिनी आणि साखर चांगली मिक्स करा आणि एखाद्या एअर टाईट डब्यात भरून ठेवा. 

 

कोणत्याही गोड पदार्थाची चव अधिक वाढविण्यासाठी किंवा त्याला स्पेशल टच देण्यासाठी तुम्ही या Cinnamon Sugar टॉपिंगचा वापर करू शकता. पुडिंग, पॅनकेक, शुगर डेझर्ट यांच्यासाठी तुम्ही हे टॉपिंग वापरू शकता, असे संजीव कपूर यांनी सांगितले आहे. 

 

Web Title: cinnamon and sugar mixture, perfect topping for any sweet dish, special tips shared by famous Sanjeev Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.