Join us  

राखी पौर्णिमा स्पेशल : नारळ गुळाची सुंदर बर्फी- करा तोंडात टाकताच विरघळणारी झटपट बर्फी-सण होईल खास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:15 PM

Coconut burfi recipe with jaggery : साखरेऐवजी गुळ वापरून तुम्ही  घरच्याघरी उत्तम मिठाई बनवू शकता. अर्ध्या तासाच्या आत ही मिठाई बनून तयार होईल.

सण उत्सवांच्या वेळी नेहमीच गोड धोड पदार्थ खाल्ले जातात. नेहमी नेहमी बाहेरून गोड पदार्थ आणण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धधतीनं मिठाई बनवू शकता. अनेकजण वजन वाढण्याच्या भितीने आणि शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी गोड खाणं टाळतात. (Naral-Gulachi Barfi) किंवा बाजारातून शुगर फ्री मिठाई आणतात.

साखरेऐवजी गुळ वापरून तुम्ही  घरच्याघरी उत्तम मिठाई बनवू शकता. अर्ध्या तासाच्या आत ही मिठाई बनून तयार होईल. नारळ किसायचा नसेल तर तुम्ही रेडीमेड नारळाचा किस आणू शकता. (Coconut jaggery barfi) रक्षाबंधनाच्या दिवशी (Raksha Bandhan) तुम्ही ही बर्फी कमीत कमी वेळेत बनवू शकता. (Cooking Hacks & Tips) 

साहित्य

१) किसलेलं नारळ- ३ वाटी

२) गूळ पावडर- २ वाटी

३) वेलची पावडर- १ टिस्पून

४) तूप-१ वाटी

५) काजू- ५ ते ६

६) दूध पावडर- १ कप

७) मलई -१ कप

कृती

१) एका १ ते २ नारळ किसून घ्या. किंवा तुम्ही फ्रोजन नारळाचा किसही घेऊ शकता. सगळ्यात आधी एका कढईत नारळाचा किस घाला. हा किस व्यवस्थित भाजून घ्या. नारळाच्या किसाचा रंग बदलल्यानंतर त्यात एक कप गुळ पावडर घाला.

२) गुळ पावडर आणि नारळाचा किस व्यवस्थित एकजीव करा. नंतर कप दूध पावडर आणि एक कप मलई एकत्र करून याची पेस्ट बनवा.  ही पेस्ट नारळ आणि गुळाच्या मिश्रणात घाला. 

३) वेलची पावडर आणि तूप घालून मिश्रण एकसंथ करून घ्या.  चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण ढवळत राहा. शिऱ्याप्रमाणे टेक्चर तयार झाल्यानंतर एकजीव करून गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण एका वाटीत काढा. एका ताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण घाला आणि व्यवस्थित सेट करण्यासाठी ठेवा. वर अर्धा काजू ठेवा.

४) तुम्ही त्यावर पिस्त्याचे कापही ठेवू शकता. नंतर सुरीच्या साहाय्याने नारळाची बर्फी कापून घ्या. तयार आहे स्वादीष्ट नारळ-गुळाची बर्फी

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नरक्षाबंधन