Lokmat Sakhi >Food > ना साखर - ना जास्त मेहनत, रक्षा बंधनानिमित्त भावासाठी खास करा ओल्या नारळाचे पौष्टीक लाडू

ना साखर - ना जास्त मेहनत, रक्षा बंधनानिमित्त भावासाठी खास करा ओल्या नारळाचे पौष्टीक लाडू

Coconut Ladoo | No Sugar Nariyal Ke Laddu तोंडात टाकताच विरघळतील असे पौष्टीक ओल्या नारळाचे लाडू, रक्षा बंधन होईल स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 12:43 PM2023-08-30T12:43:20+5:302023-08-30T12:46:25+5:30

Coconut Ladoo | No Sugar Nariyal Ke Laddu तोंडात टाकताच विरघळतील असे पौष्टीक ओल्या नारळाचे लाडू, रक्षा बंधन होईल स्पेशल

Coconut Ladoo | No Sugar Nariyal Ke Laddu | ना साखर - ना जास्त मेहनत, रक्षा बंधनानिमित्त भावासाठी खास करा ओल्या नारळाचे पौष्टीक लाडू

ना साखर - ना जास्त मेहनत, रक्षा बंधनानिमित्त भावासाठी खास करा ओल्या नारळाचे पौष्टीक लाडू

राखी पौर्णिमा. यंदा हा सण ३० ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते, त्यानंतर त्याला गोड मिठाई भरवते. आपल्या भावासाठी मिठाईच्या दुकानातून मिठाई आणण्यापेक्षा घरीच, नारळाचे लाडू तयार करा. नारळाचे लाडू हेल्दी असून, यात साखरेचा वापर होत नाही. त्यामुळे ज्यांना मधुमेह किंवा जे वेट लॉस करीत आहे, त्यांच्यासाठी हा लाडू फायदेशीर ठरतो.

सुका मेवा, नारळ, आणि गुळाचा वापर करून हा लाडू तयार करण्यात येतो. फक्त रक्षा बंधन नाही तर, इतरही दिवशी आपण हा लाडू खाऊ शकता. हवाबंद डब्यात साठवून ठेवल्यास हे लाडू आठवडाभर टिकतो. जेवल्यानंतर गोड पदार्थ म्हणूनही आपण हा लाडू खाऊ शकता(Coconut Ladoo | No Sugar Nariyal Ke Laddu).

ओल्या नारळाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

ओलं खोबरं

तूप

बदाम

अक्रोड

काजू

१ वाटी चणाडाळीची करा कुरकुरीत खमंग ‘खारीडाळ’! चटकमटक खायचं असेल तर पाहा खारीडाळ कशी करतात?

शेंगदाणे

मनुके

गुळ

वेलची पूड

कृती

सर्वप्रथम, ओल्या नारळाचे साल काढून मिक्सरमधून वाटून घ्या. किंवा आपण नारळ किसून देखील घेऊ शकता. एका कढईत २ चमचे तूप घाला, तूप विरघळल्यानंतर त्यात एक कप बदाम, अर्धा कप अक्रोड, अर्धा कप काजू घालून भाजून घ्या. भाजलेला सुका मेवा एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर कढईत २ कप शेंगदाणे घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले शेंगदाणे एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात मनुके घालून भाजून घ्या. व भाजलेले मनुके एका बाऊलमध्ये काढून घ्या.

कढईत एक चमचा तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात किसलेलं खोबरं घालून भाजून घ्या. मिक्सरच्या भांड्यात भाजलेला सुका मेवा, भाजलेले शेंगदाणे घालून बारीक पावडर तयार करून घ्या.

ग्लुकोज बिस्किटचे पेढे? बघा १० रुपयांत भन्नाट पेढ्याचा प्रकार, झटपट आणि मस्त

एका कढईत दीड कप गुळ घाला. त्यात एक कप पाणी घालून गुळ विरघळेपर्यंत चमच्याने ढवळत राहा. गुळ विरघळल्यानंतर त्यात ओलं खोबरं, सुका मेवा - शेंगदाण्याची पावडर, बारीक चिरलेला काजू - बदाम, मनुके आणि एक चमचा वेलची पावडर घालून साहित्य एकजीव करा.

गरम असतानाच हाताला तूप लावून लाडू वळवून घ्या. व हवाबंद डब्यात लाडू साठवून ठेवा. अशा प्रकारे नारळाचे लाडू खाण्यासाठी रेडी.

Web Title: Coconut Ladoo | No Sugar Nariyal Ke Laddu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.