Join us  

ना गॅस - ना साखर, खोबऱ्याचे 'या' पद्धतीने करा लाडू; कंबरदुखी - गुडघेदुखीचं दुखणं होईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2024 8:12 PM

Coconut Ladoo - No Sugar New & Better Healthy Way | Nariyal Ke Laddu in 30 Mins Festival Special : गुडघेदुखी - कंबरदुखीने जगणं अवघड केलं असेल तर, रोज १ खोबऱ्याचे लाडू खा

आजकाल प्रत्येकाला हाडांच्या समस्या भेडसावत आहे (Bone Health). कमी वयातही लोकांना कंबरदुखी, गुडघेदुखी, अंगदुखीच्या वेदना जाणवतात (Health Tips). ज्यामुळे शारीरिक काम करताना, थकवा जाणवतो (Coconut Laddoo). ही समस्या बिघडलेली जीवनशैलीमुळे उद्भवते. त्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, यासाठी आहारात विशेष पदार्थांचा समावेश करायाल हवा. जर शरीराला पौष्टीक घटक मिळाले नाही तर, गंभीर आजारांचा धोका वाढतो. यासाठी आपण आहारात खोबऱ्याच्या लाडवांचा समावेश करू शकता.

जर आपल्याला आहारातून पौष्टीक घटक मिळत नसेल तर, खोबऱ्याचे लाडू खा. नारळामध्ये आयर्न, फायबर, प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. यामुळे हाडं मजबूत, दुखणे दूर आणि आरोग्यही सुदृढ राहते. खोबऱ्याचे पौष्टीक लाडू नेमके तयार करायचे? पाहूयात(Coconut Ladoo - No Sugar New & Better Healthy Way | Nariyal Ke Laddu in 30 Mins Festival Special).

खोबऱ्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

खोबरं

बदाम

सर्दी - खोकला, ॲसिडिटीचा त्रास होईल छूमंतर; फक्त चहामध्ये घाला 'ही' खास पांढरी पावडर; तब्येत सुधारेल

अक्रोड

किशमिश

वेलची पूड

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे तुकडे घालून बारीक करून घ्या. एका बाऊलमध्ये बारीक केलेलं खोबरं काढून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात एक कप बदाम, अक्रोड आणि किशमिश घालून पावडर तयार करा.

सुटलेलं पोट कमीच होत नाही? 'या' पौष्टीक पीठाचे सूप प्या; वेट लॉस होईल - दिसाल सुडौल सुंदर

तयार ड्रायफ्रुट्सची पावडर बारीक केलेल्या खोबऱ्यामध्ये घालून मिक्स करा. शेवटी त्यात चमचाभर वेलची पावडर घाला. आणि सर्व साहित्य एकजीव करा. आणि हाताला थोडे तूप लावून लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे खोबऱ्याचे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी. आपण हे लाडू रोज दुधासोबत खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहेल्थ टिप्स