चहाशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही असे खूप लोक तुम्हाला सापडतील. सकाळी चहा घेतला नाही तर पूर्ण दिवसच खराब जातो असेही काही लोक आहेत. थंडीच्या दिवसात गरमागरम चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच. चहाचे वेगवेगळे प्रकार तुम्ही आतापर्यंत ट्राय केले असतील. नारळाच्या करवंटीतला चहा करायला सोपा तितकाच कडक, चविष्ट सुद्धा लागतो. करवंटीत चहा करण्याची झटपट सोपी रेसेपी पाहूया. (How to Make Coconut Tea Easy Recipe)
मुळात नारळ फोडलं की आपण करवंटी फेकून देतो. त्यात चहा करुन पहावा अशी आयडिया ज्याला सुचली त्याचं डोकं भारीच म्हणायचं. चहाची करवंटी गॅसवर ठेवून त्यात कपभर चहा सहज उकळता येतो. आता घरात ढीगभर पातेली असताना नारळाच्या करवंटीत चहा कशाला असा प्रश्न पडलाच असेल तर हौसेला मोल नसतो. फूड एक्सपिरीमेण्ट ज्यांना करायला आवडतं ते असे उद्योग करतात. तर त्याच हौसेतून आलेला हा करवंटी चहा. करुन पहा, आवडणार असेल तर?
नारळाच्या करवंटीत चहा कसा करायचा?
सगळ्यात आधी गॅसवर रिकामी करवंटी ठेवा करवंटी थोडी गरम झाल्यानंतर त्यात पाणी घााला. पाणी गरम झाल्यानंतर त्यात आलं किसून घाला. एक उकळ आल्यानंतर त्यात एक कप दूध घाला दूधात चहा पावडर घालल्यानंतर चवीसाठी साखर किंवा गूळ घाला. तयार आहे कोकोनट टी.