Lokmat Sakhi >Food > भारती सिंग लेकासाठी करते थंडीत खास पौष्टिक लाडू, पाहा तिनं सांगितलेली खास रेसिपी...

भारती सिंग लेकासाठी करते थंडीत खास पौष्टिक लाडू, पाहा तिनं सांगितलेली खास रेसिपी...

Comedian Bharti Singh Made Kali Mirch Makhane Laddu Recipe : Kalimirch makhana ladoo for winters : Kali Mirch Aur Makhane Ke Laddu : मखाणा आणि मिरी घातलेल्या लाडवांची खास रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2024 06:06 PM2024-12-05T18:06:47+5:302024-12-05T18:07:50+5:30

Comedian Bharti Singh Made Kali Mirch Makhane Laddu Recipe : Kalimirch makhana ladoo for winters : Kali Mirch Aur Makhane Ke Laddu : मखाणा आणि मिरी घातलेल्या लाडवांची खास रेसिपी...

Comedian Bharti Singh Made Kali Mirch Makhane Laddu Recipe Kalimirch makhana ladoo for winters Kali Mirch Aur Makhane Ke Laddu | भारती सिंग लेकासाठी करते थंडीत खास पौष्टिक लाडू, पाहा तिनं सांगितलेली खास रेसिपी...

भारती सिंग लेकासाठी करते थंडीत खास पौष्टिक लाडू, पाहा तिनं सांगितलेली खास रेसिपी...

हिवाळा ऋतू म्हटलं की सर्दी, खोकल्याचा त्रास अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं होतो. घरातील लहान मुलांसाठी काहीवेळा हिवाळ्याचे दिवस म्हणजे नकोसेच (Kali Mirch Aur Makhane Ke Laddu) वाटतात. लहान मुलं वातावरणातील गारठा फारसा सहन करु शकत नाहीत. यामुळेच हिवाळ्यात मुलांची इम्युनिटी बिघडून वरचेवर त्यांना ताप, खोकला, सर्दी, कफ असे असे लहान - मोठे आजार होतात. मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांची प्रतिकारक शक्ती तितकी स्ट्रॉंग नसते, यामुळे हिवाळ्यात लहान मुलांच्या तब्येतीची खूप काळजी घेतली पाहिजे. उबदार कपडे घालायला, कानाला रुमाल बांधायला किंवा टोपी घालायला मुलं नाही म्हणतात. पायात सॉक्स घालणं त्यांना आवडत नाही. यामुळे मग थंडीचा त्रास होतो आणि चटकन सर्दी- खोकला होतो(Kalimirch makhana ladoo for winters).

सर्दी- खोकल्याचा त्रास वाढू नये म्हणून आई- वडील त्यांना लगेचच औषध- गोळ्या देतात. पण असं वारंवार औषधं देणं मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही. यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करु शकतो. सुप्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंग (comedian bharti singh) हिने नुकतेच एक रेसिपी शेअर केली आहे. मुलांना हिवाळयात गारव्याने सर्दी - खोकला - ताप वरचेवर येऊ नये यासाठी, तिने तिच्या बहिणीने सांगितलेली सिक्रेट लाडूंची रेसिपी सांगितली आहे. हे पौष्टिक लाडू मुलांना हिवाळ्यात रोज एक खायला दिल्याने हिवाळ्यात सतावणाऱ्या लहान - मोठ्या आजारांच्या कुरबुरी कमी होतात. कॉमेडीयन भारती सिंग हिने शेअर केलेली लाडूंची रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. मखाणे - २ कप 
२. काळीमिरी - १ कप 
३. चणे - ३ कप (सालं काढून कोरडे भाजून घेतलेले)
४. ड्रायफ्रुटस - २ कप (आपल्या आवडीनुसार)
५. खडीसाखर - २ कप 
६. साजूक तूप - ५ ते ६ टेबलस्पून 

बाजरीची भाकरी नी उडदाचं घुटं, अस्सल मराठी झणझणीत बेत! खा घुटं, बाकी सगळं त्यासमोर फिकं...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी चणे घेऊन ते कोरडे भाजून घ्यावेत. चणे कढईत कोरडे भाजून घेतल्यानंतर त्यावरील सालं काढून टाकावी. 
२. आता मखाणे आणि काळीमिरी, ड्रायफ्रुटस हे तिन्ही जिन्नस देखील वेगवेगळे कोरडे भाजून घ्यावेत. 
३. सगळे जिन्नस भाजून घेतल्यावर ते थोडे थंड होण्यासाठी ठेवून द्यावेत. मिश्रण गार झाल्यावर एक एक पदार्थ घेऊन मिक्सरमधून त्याची बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्यावा. 
४. मखाणे, काळीमिरी, चणे भाजून गार झाल्यावर यांची मिक्सरमध्ये बारीक वाटून पूड करुन घ्यावी. 

आजी म्हणायची ‘मोरावळा' खा, वर्षभर निरोगी राहा! पाहा मोरावळा करण्याची पारंपरिक रेसिपी...

५. आता एका मोठ्या कढईत साजूक तूप घेऊन ते पूर्णपणे विरघळवून घ्यावे. साजूक तूप विरघळल्यावर त्यात भाजून घेतलेल्या चण्याचे पीठ, काळीमिरी पूड, माखण्यांची बारीक पूड आणि ड्रायफ्रुटसचे बारीक तुकडे घालावे. आता हे सगळे जिन्नस साजूक तुपात ५ ते ६ मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यावेत. 
६. या सगळ्या मिश्रणाला हलकासा खरपूस रंग आल्यावर गॅस बंद करुन कढईतील मिश्रण एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावे.
७. हाताला थोडेसे तूप लावून मग हे लाडूचे पीठ हलके गरम असतानाच लाडू वळून घ्यावेत. 

हिवाळयात पौष्टिक आणि हेल्दी लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

 

Web Title: Comedian Bharti Singh Made Kali Mirch Makhane Laddu Recipe Kalimirch makhana ladoo for winters Kali Mirch Aur Makhane Ke Laddu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.