Lokmat Sakhi >Food > वरण-भाताबरोबर खायला ५ मिनिटात करा बटाट्याच्या काचऱ्या; घ्या झटपट, सोपी खमंग रेसिपी

वरण-भाताबरोबर खायला ५ मिनिटात करा बटाट्याच्या काचऱ्या; घ्या झटपट, सोपी खमंग रेसिपी

Cook spicy potato How to make batatyache kap : बटाट्याची भाजी किंवा भजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. पण वेगळ्या पद्धतीचे बटाट्याचे काप बनवायला सोपे आणि खायलाही उत्तम असतात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 01:13 PM2023-07-28T13:13:31+5:302023-07-28T15:41:34+5:30

Cook spicy potato How to make batatyache kap : बटाट्याची भाजी किंवा भजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. पण वेगळ्या पद्धतीचे बटाट्याचे काप बनवायला सोपे आणि खायलाही उत्तम असतात

Cook spicy potato dish : How to make batatyache kap Potato Fry Recipe Quick Aloo Fry | वरण-भाताबरोबर खायला ५ मिनिटात करा बटाट्याच्या काचऱ्या; घ्या झटपट, सोपी खमंग रेसिपी

वरण-भाताबरोबर खायला ५ मिनिटात करा बटाट्याच्या काचऱ्या; घ्या झटपट, सोपी खमंग रेसिपी

जेवणाबरोबर  तोंडी लावणासाठी चटणी, लोणचं, भजी किंवा इतर पदार्थ असतील तर जेवणाची मजाच वेगळी असते. प्रत्येकाच्या जेवणात भात किंवा खिचडी असते. वरण भाताबरोबर खाण्यासाठी तुम्ही बटाट्याचे काप किंवा बटाट्याच्या काचऱ्या अगदी कमीत कमी वेळाच बनवू शकता. सगळ्याच्यांच स्वयंपाकघरात बटाटे असतात. बटाट्याची भाजी किंवा भजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. पण वेगळ्या पद्धतीचे बटाट्याचे काप बनवायला सोपे आणि खायलाही उत्तम असतात. (How to make babatyache kap) मुलांना शाळेचा डबा देण्यासाठी किंवा जेवताना तोंडी लावणीसाठी हा उत्तम पर्याय आहे.

बटाट्याच्या काचऱ्या बनवण्याचे साहित्य

बटाटा - १ ते २

हळद - १/४ टिस्पून

मिरची पावडर - १/२ टिस्पून

आमचूर - १ टीस्पून

हिंग - १/४  टीस्पून

रवा - १ वाटी

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

सगळ्यात आधी बटाटे स्वच्छ धुवून सालं काढून घ्या. साल काढल्यानंतर बटाट्याचे गोल काप करून ते पाण्यात ठेवा. नाहीतर बटाटा काळा पडतो.  हे काप नंतर दुसऱ्या भांड्यात काढा. त्यात हळद, तिखट, आमसूल पावडर, हिंग आणि मीठ घाला आणि व्यवस्थित एकजीव करा. बटाट्यांनी दोन्ही बाजूंनी रवा लावून ते  गरम तेलात तळून घ्या. एक बाजू फ्राय  झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनंही बटाटा फ्राय करून घ्या. तयार आहेत गरमागरम बटाट्याच्या काचऱ्या. डाळ-भातासह किंवा चपातीसोबत तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता.

बटाटा भाजी झटपट कशी बनवायची?

१) प्रथम उकडलेले बटाटे बारीक चिरा. नंतर कढईत तेल गरम करा आणि मोहरी आणि जिरे थोडे परतून घ्या, आता कढीपत्ता आणि कांदे घाला आणि 1 मिनिट परतून घ्या, नंतर आले-लसूण पेस्ट घाला, पुन्हा एक मिनिटं शिजवा, आता हिरवी मिरची, हळद आणि मीठ घालून मिक्स करा.

२) नंतर चिरलेले बटाटे घाला आणि मिक्स करा मग आणखी 1 मिनिट शिजवा.  कोथिंबीर घालून मिक्स करा. तयार आहे गरमागरम बटाट्याची भाजी.

Web Title: Cook spicy potato dish : How to make batatyache kap Potato Fry Recipe Quick Aloo Fry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.