Join us  

कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी येतं? डाळ शिजतच नाही? ५ गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 4:52 PM

Cooker Leakage problem | How to fix cooker : प्रेशर कुकरच्या शिट्टीमधून कायम डाळ बाहेर येत असेल तर..

प्रत्येकीच्या स्वयंपाकघरात एक प्रेशर कुकर तर असतेच. झटपट स्वयंपाक आवरायचं असेल तर, आपण प्रेशर कुकरमध्ये डाळ-तांदूळ लावून मोकळे होतो. प्रेशर कुकरच्या ३ ते ४ शिट्ट्यांमध्ये डाळ-भात परफेक्ट शिजते. डाळ-भाताशिवाय आपण त्यात इतरही पदार्थ शिजवण्यासाठी घालू शकता. पण बहुतांश गृहिणी त्यात डाळ शिजवतात. मात्र बऱ्याचदा कुकर जुना झाला की त्यात योग्यप्रकारे प्रेशर तयार होत नाही (Kitchen Tips).

परिणामी पदार्थ शिजण्यासाठी अडचण निर्माण होते. कधी कुकरची शिट्टीच होत नाही (Pressure Cooker Tips). तर कधी शिट्टीमधून संपूर्ण डाळ बाहेर येते. त्यामुळे प्रेशर कुकर वारंवार खराब होते ते वेगळंच. शिट्टीमधून डाळ फसफसून बाहेर येऊ नये, यासाठी आपण काही टिप्स फॉलो करू शकता(Cooker Leakage problem | How to fix cooker).

प्रेशर कुकरच्या शिट्टीमधून डाळ फसफसून बाहेर येऊ नये यासाठी काही टिप्स

- प्रेशर कुकर नेहमी स्वच्छ करून वापरावे. त्यात अन्न अडकले तर शिट्टी नीट होत नाही. शिवाय कुकरच्या आतमध्ये प्रेशर तयार होत नाही, ज्यामुळे कुकरचा स्फोट होण्याची शक्यता जास्त असते.

साबुदाणे वडे फुगतच नाही? फार तेल पितात? एक सिंपल ट्रिक, हॉटेलस्टाईल साबुदाणा वडे करण्याची सोपी कृती

- शिट्टी स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात भिजत ठेवा. नंतर ब्रशने कुकरची शिट्टी स्वच्छ करा. यामुळे मेहनत न घेता शिट्टी स्वच्छ होईल. शिवाय शिट्टीतून अन्न आणि डाळीचा फेस बाहेर येणार नाही.

- प्रेशर कुकर लावण्यापूर्वी गॅस्केट तपासा. बऱ्याचदा नकळत गॅस्केट कापले जाते. ज्यामुळे शिट्टीतून पाणी गळते. गॅस्केट साफ करण्यासाठी आपण थंड पाण्याचा वापर करू शकता.

- जर गॅस्केट सैल झाले असेल तर, रबर फ्रिजरमध्ये एक तास ठेवा. यामुळे रबर नीट बसेल. जर रबर खराब झाले असेल तर, बदलून आणा.

ना गॅसचा वापर-ना फ्रिजची गरज, सेकंदात लिंबू सरबत करण्याची खास युक्ती-होईल सरबत झटक्यात रेडी

- तसेच कुकरचे हँडल नीट बंद आहे की नाही तेही पहा. कुकरवर काहीही शिजवताना गॅस मंद आचेवर ठेवा. यामुळे शिट्टीतून पाणी किंवा अन्न बाहेर येणार नाही. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स