भारतीय जेवण वरण भाताशिवाय जेवण अपूर्ण आहे. वरण भात हा कॉमन पदार्थ असला तरी प्रत्येक घरातील वरणाची चव वेगवेगळी असते. डाळीला फोडणी देण्याच्या अनेक पद्धती आहेत. (Cooking Hacks) नेहमी नेहमी त्याच टाईपचे जेवण न करता तुम्ही वेगळ्या पद्धतीने वरण बनवले तर जेवणाची चव दुप्पटीने वाढेल. काही सोप्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात. (How to make Hotel Style Dal at Home) जसंही वरण बनवताना मीठ आणि हळद कधी घालावी याची परफेक्ट टायमिंग तुम्हाला माहित असले तर पदार्थांची चव दुप्पटीने वाढेल. (Correct Time To Add Salt And Turmeric While Cooking Dal)
अनेकजण डाळ बनवताना मीठ आणि हळद घालण्याची योग्य पद्धत समजून न घेता पदार्थ बनवतात ज्यामुळे पदार्थांची चव बिघडू शकते. डाळीत हळद, मीठ योग्यवेळी घातली तर त्याची चव आणि पौष्टीकता दोन्ही वाढेल. डाळ बनवण्याआधी अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा. नंतर डाळ कुकरमध्ये घाला आणि डाळीत दुप्पट पाणी मिसळा. कुकरऐवजी तुम्ही कढईमध्येही डाळ बनवू शकता.
त्यानंतर डाळीत मीठ आणि अर्धा चमचा हळद घाला आणि थोडावेळ उकळू द्या. त्यानंतर कुकरचं झाकण बंद करा. या पद्धतीने डाळ उकळल्यानंतर खाली उतरवून घ्या. यामुळे डाळीची चव दुप्पटीने वाढेल आणि डाळीचे पोषण मुल्यही वाढेल. नंतर डाळ कुकरमध्ये घाला आणि त्यात दुप्पट पाणी मिसळा. ही चविष्ट डिश बनवण्यासाठी कढईमध्ये जीरं घाला आणि बारीक केलेले कांदा, टोमॅटो आणि लसूण भाजून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये ठेवलेली डाळ पटलून घ्या. ज्यामुळे डाळ चवदार आणि चविष्ट बनेल.
डाळीची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात तेलाऐवजी तुपाची फोडणी देऊ शकता, डाळ शिजवाताना त्यात टोमॅटो घाला. ज्यामुळे डाळीला पूर्णपणे आंबटपणा येईल. कधीतरी फोडणी घालताना डाळीत बटर घाला ज्यामुळे डाळ अधिकच चवदार लागेल. डाळीच्या फोडणीत लसणाची पेस्ट किंवा चिरलेले लसूण घालायला विसरू नका, डाळीत ओलं नारळही मिसळू शकता. सध्या ऊन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे तुम्ही डाळीत कैरी घालून एक वेगळा फ्लेवर देऊ शकता.