Lokmat Sakhi >Food > २ मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे; मटार सोलण्याची सोपी ट्रिक-पटापट सोलून होतील

२ मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे; मटार सोलण्याची सोपी ट्रिक-पटापट सोलून होतील

Cooking Hacks : थंडीच्या वातावरणात वाटाण्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात पण मटार सोलायचे म्हणजे एक मोठा टास्क वाटतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 04:58 PM2023-12-04T16:58:20+5:302023-12-05T12:35:56+5:30

Cooking Hacks : थंडीच्या वातावरणात वाटाण्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात पण मटार सोलायचे म्हणजे एक मोठा टास्क वाटतो.

Cooking Hacks : Easy Trick to peel green peas in 2 minutes Trick to peel green peas in minutes | २ मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे; मटार सोलण्याची सोपी ट्रिक-पटापट सोलून होतील

२ मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे; मटार सोलण्याची सोपी ट्रिक-पटापट सोलून होतील

थंडीचे दिवस सुरू होताच लोक बाजारातून पिशव्या भरून भरून मटार घरी घेऊन येतात. कारण थंडीच्या दिवसात मटार स्वस्त असतात आणि मटारचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. (How to Peel Green Peas Easily) पावभाजी, मटारचा  शीरा, मटार-पनीर, मटार-बटाटा, व्हेज कुर्मा, व्हेज पुलाव यांसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात मटार वापरले जातात. मटार खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात याशिवाय  तब्येतही चांगली राहते.  (Matar Solnyachi Trick)

थंडीच्या वातावरणात वाटाण्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात पण मटार सोलायचे म्हणजे एक मोठा टास्क वाटतो. कारण तासनतास एकाचजागी बसून मटार सोलल्यानंतर काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर मटार सोलण्याचं काम सोपं होईल आणि मटार पटकन सोलून होतील. (How to Peel The Gren Peas Fast)

मटार सोलण्याची सोपी ट्रिक कोणती

१) मटार सोलण्यासाठी तासनतास न घालवता  सोप्या पद्धतीने मटार सोलण्यासाठी तुम्ही पाणी पिण्याच्या ग्लासचा वापर करू शकता. सगळ्यात आधी एक भांडं घेऊन त्यात मटार घाला आणि व्यवस्थित धुवून घ्या. दुसरीकडे भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडं मीठ घाला आणि गॅसवर ठेवा. पाणी थोडं गरम करून त्यानंतर त्यात मटार घाला. १० मिनिटांनी गॅस बंद करा. मटार मऊ झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या आणि थोडं थंड होऊ द्या. 

२) पाणी पिण्याचा ग्लास सरळ ठेवून मटारवर रगडा. त्यानंतर मटार आणि साल वेगळे होईल आणि वाटाणे बाहेर येतील. ही ट्रिक खूपच सोपी आहे.  या पद्धतीने तुम्ही किलोभर मटार अगदी २ ते ५ मिनिटांत सोलू शकता. काहा मिनिटांतच मटार सोलून होतील. या स्टेप्स वापरून मटार सहज सोलता येतील.

३) मटार सोलण्यापूर्वी तव्यावर किंवा मायक्रोव्हेव्हमध्ये हलके गरम करून घ्या. गरम झाल्यानंतर मटार पटकन सोलून होतील. यासाठी तुम्हाला फार मेहनत करायची गरज नाही.  याशिवाय मटारचे सुरूवातीचे टोक आणि मागचे टोक सुरीने किंवा कैचीने कापले तर मधला भाग सहज मोकळा होईल आणि वाटाणे बाहेर निघतील.

Web Title: Cooking Hacks : Easy Trick to peel green peas in 2 minutes Trick to peel green peas in minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.