Join us  

२ मिनिटांत कणीक भिजवण्याची १ सोपी ट्रिक, हात ही न लावता कणीक भिजवण्याची जादू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 2:50 PM

Cooking Hacks How to make Chapati Dough : जास्तीत जास्त घरांमध्ये चपातीचं पीठ चाळून चपात्या बनल्या जातात. जर पीठ व्यवस्थित गाळलं नाही तर चपात्या व्यवस्थित फुगत नाहीत.

चपात्या प्रत्येक घरांमध्ये बनवल्या जातात.  (Cooking Hacks) पण रोज चपात्यांसाठी पीठ मळणं अनेकींना कठीण वाटतं. पीठ हात आणि बोटांना चिटकतं, कणीक कधी पातळ होते तर कधी जास्त घट्ट असा प्रोब्लेम होतो.  (Kitchen Tips) काही सोप्या किचन ट्रिक्स तुमचं हे काम सोपं करू शकतात.  यामुळे स्वंयपाकही चवदार होईल आणि खाणारेही आनंदाने खातील. (Cooking Hacks & Tips)

या पद्धतीनं पीठ मळा

प्रत्येकाच्या घरात मिक्सर मिक्सरचं भाडं असतं. एका मोठ्या आकाराच्या मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी पीठ, मीठ आणि तेल घाला. त्यानंतर यात पाणी घाला. आता मिक्सरचं झाकण बंद करून ३  सेकंदासाठी  ३ ते ४ वेळा फिरवून मिक्सर बंद करा. जेव्हा तुम्ही झाकण उघडाल तेव्हा तुम्हाला दिसेल की पीठ पाण्याबरोबर व्यवस्थित मिक्स झालं आहे. हे पीठ भांड्याला चिकटलेलं दिसणार नाही. एका मोठ्या प्लेटमध्ये काढून हे पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घ्या. त्यानंतर हातात थोडं पीठ घेऊन पिठाचे गोळे बनवून घ्या आणि चपात्या बनवा.

चपात्या सॉफ्ट होण्यासाठी काय करायचं?

चपात्या करताना जास्तीत जास्त लोक मीठ आणि पाण्याचा वापर करा. तर काही घरांमध्ये थोडं तेल घालून चपात्या सॉफ्ट बनवल्या जातात. पीठ मळताना त्यात थोडं तूप घातलं तर चपात्या मऊ होतात. पीठ मळताना तेलाऐवजी तुपाचा वापर करा. यामुळे फक्त चपाती सॉफ्ट बनणार नाही तर चवही चांगली लागेल.

चपातीचं पीठ गाळून वापरा

जास्तीत जास्त घरांमध्ये चपातीचं पीठ चाळून चपात्या बनल्या जातात. जर पीठ व्यवस्थित गाळलं नाही तर चपात्या व्यवस्थित फुगत नाहीत. चपात्या नरम आणि सॉफ्ट राहण्यासाठी आधी पीठ गाळायला हवं. अन्यथा चपात्या कडक बनतात.

पीठ जास्त घट्ट असू नये

पीठ जितकं जास्त मऊ असेल तितक्याच चपात्या सॉफ्ट बनतात. जेव्हाही तुम्ही पीठ मळता तेव्हा तेव्हा एकदम पाणी न घालता हळूहळू पाणी घाला. या पद्धतीने पीठ मळल्यास पीठ मऊ राहील आणि चपात्याही छान लाटल्या जातील.

पीठ कापडानं झाकून ठेवा

चपाती बनवण्याआधी पीठ काही वेळासाठी कापडानं झाकून ठेवा. पीठ मळल्यानंतर लगेच चपात्या बनवू नका. ओल्या कापडानं कणीक झाकून ठेवा. जास्त वेळ पीठ उघड्यावर ठेवल्यानं कणकेचं टेक्स्चर बदलतं आणि चपात्या सॉफ्ट होत नाहीत.

चपात्या काळ्या होण्यापासून कसं रोखाल

अनेकांची  अशी तक्रार असते की पीठ काळं पडतं.  त्यामुळे चपात्याही काळ्या होतात. जास्तवेळ मळलेलं पीठ उघड्यावर ठेवल्यानंतर ते काळं पडतं आणि चपात्याही काळ्या होतात.  जर चपाती लाटून काही वेळ तशीच ठेवली तर देखील  काळी पडते म्हणून चपातीवरचे अतिरिक्त पीठ झटकून टाकावे. 

टॅग्स :किचन टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.