Lokmat Sakhi >Food > Cooking Hacks : १ वाटी डाळ भिजवून १५ मिनिटांत करा कुरकुरीत, खमंग मेदूवडे; ही घ्या परफेक्ट, इस्टंट रेसेपी

Cooking Hacks : १ वाटी डाळ भिजवून १५ मिनिटांत करा कुरकुरीत, खमंग मेदूवडे; ही घ्या परफेक्ट, इस्टंट रेसेपी

Cooking Hacks : दळताना मिक्सरमध्ये डाळी, मीठ, ओवा, तेल, पाणी घाला. ओवा तुम्ही दळल्यानंतरही मिश्रणात घालून एकजीव करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 02:24 PM2022-12-29T14:24:56+5:302022-12-29T14:37:30+5:30

Cooking Hacks : दळताना मिक्सरमध्ये डाळी, मीठ, ओवा, तेल, पाणी घाला. ओवा तुम्ही दळल्यानंतरही मिश्रणात घालून एकजीव करू शकता.

Cooking Hacks : How to make instant medu vada medu vada recipe | Cooking Hacks : १ वाटी डाळ भिजवून १५ मिनिटांत करा कुरकुरीत, खमंग मेदूवडे; ही घ्या परफेक्ट, इस्टंट रेसेपी

Cooking Hacks : १ वाटी डाळ भिजवून १५ मिनिटांत करा कुरकुरीत, खमंग मेदूवडे; ही घ्या परफेक्ट, इस्टंट रेसेपी

नाश्त्याला इडली, डोसा, मेदूवडा असे दक्षिण भारतीय पदार्थ सर्वांचीच पहिली पसंती असते. नाश्त्याला   मेदूवडा सांभार खायला बऱ्याच जणांना आवडतं. पण नेहमी नेहमी बाहेरून नाश्ता आणणं शक्य होतचं असं नाही. याशिवाय बाहेरचे पदार्थ करताना तेल कोणतं वापरतात. (Instant Meduvada Recipe) स्वच्छता ठेवली जाते की  नाही असेही प्रश्न मनात येतात. अनेकांना बाहेरचे पदार्थ खाल्ल्यानंतर खोकल्याचा त्रास होतो.  (How to make medu vada) घरच्याघरी कमीत कमी वेळात मेदू वडा बनवण्याची सोपी रेसेपी  पाहूया. 

साहित्य -

उडीद डाळ (२ कप),

मूग डाळ (२ टेबलस्पून),

अजवाईन,

मीठ,

पाणी,

तेल

कृती

- सगळ्यात आधी  दोन्ही डाळी व्यवस्थित धुवून घ्या आणि ३ ते ४ तास भिजवा. भिजवलेल्या डाळींचं पाणी उपसून दळून घ्या. 

- दळताना मिक्सरमध्ये डाळी, मीठ, ओवा, तेल, पाणी घाला. ओवा तुम्ही दळल्यानंतरही मिश्रणात घालून एकजीव करू शकता.  यानंतर दळलेलं पीठ ५ ते १० मिनिटं बाजूला ठेवून गरमागरम वडे तळून घ्या.

- हे वडे तुम्ही गरमागरम सांभार किंवा चटणीबरोबर  खाऊ शकता. 

Web Title: Cooking Hacks : How to make instant medu vada medu vada recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.