चपात्या किंवा भाकरीची पीठ, बेसन पीठ, मैदा चाळताना अनेकदा पीठ खाली ठेवलेल्या ताटाच्या बाहेर पडतं आणि सर्वत्र डाग पडतात. जेव्हा चाळणीने पीठ चाळले जाते तेव्हा ते परातीच्या बाहेर पडते. (Kitchen Hacks) स्वंयपाक करत असाताना पीठात कोंडा असू नये, कचरा, कोंडा किंवा छोटे किटक असतील तर ते बाहेर पडावेत यासाठी पीठ चाळून घेतलं जातं. पीठ चाळत असताना ते पाणी बाहेर पडू नये यासाठी सोप्या ट्रिक्स वापरायला हव्यात. ज्यामुळे घरात एक्स्ट्रा पसारा न होता पीठ व्यवस्थित चाळलं जाईल.(How to Sieve Flour Without Any Mess Try This Viral Hack)
इंस्टाग्राम वर एसएम कट्टा नावाच्या अकाऊंटवरून पीठ चाळण्याची एक भन्नाट ट्रिक शेअर करण्यात आली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही सोप्या पद्धतीने पीठ परातीबाहेर पडू न देता चाळू शकाल हा प्रयोग अत्यंत सोपा असून घरच्याघरी करता येईल असा आहे. या व्हिडिओतील महिला पीठ चाळण्याच्या सोप्या स्टेप्स प्रेक्षकांना सांगत आहे,
हा प्रयोग करण्यासाठी सगळ्यात आधी एक परात घ्या. त्यावर चाळणी ठेवा. आता पिण्याच्या एका ग्लासमध्ये पीठ घ्या. पिठाने भरलेला ग्लास परातीत ठेवलेल्या चाळणीवर उलटा करून तसंच ठेवा. पिठाने भरलेला हा ग्लास उलटा तसाच राहू द्या. चाळणी परातीपासून थोडी वर घ्य. त्यात पिठाने भरलेला ग्लास गोल गोल फिरवून घ्या. या ट्रिकने पीठ कुठेही इतरत्र न पाडता पीठ गाळून होईल. किंवा तुम्ही चाळणीपेक्षा मोठं भांड घेऊ शकता जेणेकरून पीठ खाली पडणार नाही.
पोटाची चरबी लटकतेय? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा १ उपाय, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल
पीठ का चाळायचे असते?
पीठ चाळण्याचा मुख्य उद्देश असा असतो की पिठात कोणत्याही गुठळ्या राहू नयेत. चाळलेलं पीठ न चाळलेल्या पिठाच्या तुलनेत हलकं आणि जास्त मऊ बनते. केक बनवण्याआधी मैदा गाळून घेतल्यास केकचे टेक्स्चर बिघडत नाही. भाकरीचे पीठ चाळल्यास त्यात कोंडा राहत नाही आणि भाकरी मऊ होते.