Lokmat Sakhi >Food > भाजी करताना रस्सा थोडा घट्ट होण्यासाठी काय करायचं? ५ टिप्स-हॉटेलसारख्या भाज्या होतील घरी

भाजी करताना रस्सा थोडा घट्ट होण्यासाठी काय करायचं? ५ टिप्स-हॉटेलसारख्या भाज्या होतील घरी

Cooking Hacks (Bhajicha Rassa Ghatt kasa karava) : घरी बनवलेल्या भाजीची ग्रेव्ही जाड होण्यासाठी काय करायचं याच्या सोप्या टिप्स पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:12 PM2023-10-31T12:12:18+5:302023-10-31T14:02:46+5:30

Cooking Hacks (Bhajicha Rassa Ghatt kasa karava) : घरी बनवलेल्या भाजीची ग्रेव्ही जाड होण्यासाठी काय करायचं याच्या सोप्या टिप्स पाहूया.

Cooking Hacks : Tips and Tricks to Thicken Gravy Kitchen Hacks Easy ways to thicken gravy | भाजी करताना रस्सा थोडा घट्ट होण्यासाठी काय करायचं? ५ टिप्स-हॉटेलसारख्या भाज्या होतील घरी

भाजी करताना रस्सा थोडा घट्ट होण्यासाठी काय करायचं? ५ टिप्स-हॉटेलसारख्या भाज्या होतील घरी

 रेस्टॉरंटस्टाईल स्टाईल परफेक्ट ग्रेव्हीच्या भाज्या खायला प्रत्येकालाच आवडतात.  कितीही ठरवलं तरी घरात रेस्टॉरंट स्टाईलच्या भाज्या बनवता येत नाहीत. भाजी पातळ होते रूचकर लागत नाही अशी अनेकांची तक्रार असते. घरात उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा वापर करून तुम्ही सुपरटेस्टी ग्रेव्ही बनवू शकता. (Bhaji ghatt honyasathi upay) यामुळे भाजीची चव खराब होणार नाही आणि चवसुद्धा वाढेल.  घरी बनवलेल्या भाजीची ग्रेव्ही जाड होण्यासाठी काय करायचं याच्या सोप्या टिप्स पाहूया. (Tips and Tricks to Thicken Gravy Kitchen Hacks)

टोमॅटो प्युरी (Genius Ways to Thicken Gravy Using Items From Your kitchen)

हॉटेल स्टाईल ग्रेव्ही बनवण्यासाठी तुम्ही टोमॅटो प्युरीचा बेस तयार करू शकता. बरेच शेफ त्यांच्या रेसिपीत टोमॅटो प्युरीचा समावेश करतात. हा बेस बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घ्या. तुम्ही यात लसूण किंवा  कांदाही घालून काही वेळ शिजवून घ्या. नंतर कापलेले टोमॅटो, मीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्या मध्ये-मध्ये झाकण ठेवून वाफ काढून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या.  या ग्रेव्हीचा बेसचा वापर तुम्ही इतर पदार्थांमध्येही करू शकता. (वाटीभर बेसनाचा ५ मिनिटांत करा 'इडली ढोकळा'; फुललेला ढोकळा इडली पात्रात करण्याची भन्नाट ट्रिक)

मैदा/ मक्याचे पीठ

ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी तुम्ही मैद्याचा वपर करू शकता. मैद्या मंच्युरिन, चिली पोटॅटो असे पदार्थ घट्ट करण्यासाठी वापरला जातो. यासाठी एका वाटीत २ चमचे मैदा आणि अर्धा कप पाणी घेऊन याचे मिश्रण तयार करा आणि ग्रेव्हीत मिसळा. जर तुम्ही मैदा अजिबातच खात नसाल तर मैद्याऐवजी मक्क्याचं पीठ, ज्वारीच्या पीठाचा वापर करू शकता. 

दुधावर पराठ्यासारखी घट्ट साय येईल; दूध गरम करताना ५ ट्रिक्स वापरा-दुधावर जाड मलई येईल

बेसन

बेसन पीठ सर्वांच्याच घरी उपलब्ध असते. बेसनाचा वापर करण्याआधी बेसन व्यवस्थित भाजून घ्या. याची पेस्ट बनवण्यासाठी  एक चमचा बेसनात अर्धा कप पाणी मिसळून पेस्ट तयार करा. बेसनाच्या पीठामुळे भाजीला मस्त टेक्स्चर येईल. मैद्याच्या वापरापेक्षा हा पर्याय उत्तम ठरेल.

ड्रायफ्रुट्सची पेस्ट

भाज्यांमध्ये वापरण्यासाठी तुम्ही काजू, बदाम वाटून त्याची वेगवेगळी पेस्ट बनवून ठेवू शकता. यामुळे भाजीची पेस्ट घट्ट होणार नाही तर स्वादही वाढेल. याव्यतिरिक्त फ्लेक्स सिड्स आणि तीळाची पेस्टही तुम्ही घालू शकता. 

बटाट्याचा वापर

जर भाजी जास्त पातळ झाली असेल तर बटाटा स्टार्चच्या मदतीने ग्रेव्ही घट्ट करू शकता. त्यासाठी एक उकडलेला बटाटा घ्या  आणि मॅश करून भाजीत घाला.  ग्रेव्हीमध्ये बटाटा घातल्याने स्टार्च तयार होईल आणि भाजीचे टेक्सचर घट्ट होईल.
 

Web Title: Cooking Hacks : Tips and Tricks to Thicken Gravy Kitchen Hacks Easy ways to thicken gravy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.