Join us  

स्वयंपाक करताना कांदा किंवा मसाला जळाला तर? ३ टिप्स फोडणी करपूनही स्वयंपाक होईल चविष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 3:36 PM

Cooking Hacks & Tips : ऐनवेळी गडबड झाली की स्वयंपाक करताना मूड जातो, करपलेला वासही पदार्थाला लागतो. अशावेळी वापराव्या अशा युक्त्या.

भाजी किंवा कोणत्याही पदार्थाची फोडणी, वाटण तयार  करताना जर कोणाचा फोन आला किंवा दरवाज्याची बेल वाजली तर अनेकदा गॅसवरचे पदार्थ करपतात. फोडणी करपली पूर्ण भाजीची चव जाते. जास्तवेळ नसल्यानं पुन्हा कांदा, टमाटे कापत बसणं शक्य होत नाही. (Cooking Hacks & tips) अशात सगळ्यांच्याच ताटात करपलेल्या फोडणीची भाजी जाते. घरभर जळलेल्या  पदार्थांचा वासही येतो.  या लेखात तुम्हाला स्वयंपाक करताना जर  फोडणी जळाली तर काय केल्यानं भाजीची चव जाणार नाही याच्या टिप्स सांगणार आहोत. (Burnt food Mistakes and how to fix it)

पॅन किंवा कढईत जोरजोरात चमचा फिरवू नका

मसाले, भाज्या, कडधान्ये किंवा कोणतीही ग्रेव्ही जळली की ती भांड्यात चिकटू लागते. ही चूक सुधारण्यासाठी बर्‍याचदा लोक जळणारा मसाला खरडायला लागतात आणि त्यामुळे जळलेल्या मसाल्यामुळे तुमच्या संपूर्ण जेवणाची चवच बदलून जाते. (3 Ways To Remove Burnt Taste From Foods) भांड्याच्या तळाला चिकटलेले अन्न खरडून काढल्यास ते न जळलेल्या भागामध्ये मिसळते आणि कडू बनते. त्यामुळे तुम्ही पॅन किंवा कुकरवर अजिबात जोरजोरात चमचा फिरवू नका. जर मसाला खूप जळला असेल तर उरलेले मसाले वरून हळूहळू वेगळे करा. (How to fix burnt onion tomato masala) 

बटाट्याचा वापर

अनेकवेळा असे होते की मसाला थोडाजरी जळला तरी त्याचा वास संपूर्ण जेवणाला येतो. कधी कधी तीच जळलेली चव संपूर्ण जेवणाला येऊ लागते. मसाला चविष्ट राहण्यासाठी तुम्ही सोललेले कच्चे बटाटे वापरू शकता. बटाटा ही कडू आणि जळलेली चव शोषून घेतो. यासाठी ग्रेव्हीमध्ये बटाटे घालून थोडा वेळ मंद आचेवर शिजवा. 10-15 मिनिटांनी बटाटे बाहेर काढा. भाजी किंवा ग्रेव्ही मसाला छान होईल.  (पावसाळ्यात ना खराब होणार ना बुरशी लागणार; सोप्या ४ ट्रिक्स वापरा, वर्षभर टिकेल लोणचं)

दूध किंवा दही

दूध आणि दही अशा गोष्टी आहेत ज्या जळलेल्या वस्तूंचा वास सहजपणे लपवतात. आपण जळलेल्या मसाल्यामध्ये क्रीम देखील जोडू शकता. जर  भाजीचा किंवा ग्रेव्हीचा मसाला भांड्याला चिकटू लागला तर लगेच २-३ चमचे दही, दूध किंवा मलई घालून २-३ मिनिटे न ढवळता शिजू द्या. यानंतर तुमची ग्रेव्ही हळूहळू ढवळत राहा. यामुळे तुमची भाजीही चांगली होईल आणि तिची चव आणि चवही चांगली राहील. (कांदा, लसणाशिवाय बनवा घट्ट, चविष्ट ग्रेव्ही; 4 ट्रिक्स, कमी साहित्यात स्वयंपाक होईल चवदार)

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स