Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यातही इडलीचं पीठ भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, इडल्या होतील सॉफ्ट आणि हलक्य

पावसाळ्यातही इडलीचं पीठ भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, इडल्या होतील सॉफ्ट आणि हलक्य

Cooking Hacks & Tips :  इडली सॉफ्ट, स्पॉन्जी असावी असं तुम्हाला वाटत असेल तर तांदळाची निवड योग्य असायला हवी.  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 11:54 AM2023-06-25T11:54:13+5:302023-06-26T12:51:06+5:30

Cooking Hacks & Tips :  इडली सॉफ्ट, स्पॉन्जी असावी असं तुम्हाला वाटत असेल तर तांदळाची निवड योग्य असायला हवी.  

Cooking Hacks & Tips : How To Make A Perfect Idli Batter In Simple Steps  | पावसाळ्यातही इडलीचं पीठ भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, इडल्या होतील सॉफ्ट आणि हलक्य

पावसाळ्यातही इडलीचं पीठ भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, इडल्या होतील सॉफ्ट आणि हलक्य

इडली, डोसा हे दक्षिण भारतीय पदार्थ सर्वांच्याच आवडीचे असतात. (How To Make A Perfect Idli Batter In Simple Steps) प्रत्येकजण नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला या पदार्थांचा आनंद घेताना दिसतो. (How to ferment idli batter faster) नाश्त्याला इडली, मेंदूवडा असे पदार्थ खायला असले की पोट भरतं आणि मनही तृप्त होतं. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रत्यनात असाल तरीही या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (Cooking Hacks & Tips)

पावसाळ्यात बाहेरंच खायचं म्हटलं की टेंशन येतं. रोज बाहेरचे पदार्थ खाल्ले तर आजार उद्भवू शकतात. (Fermenting Idli Dosa Batter In Cold Climate) इडल्या किंवा डोसा घरी बनवायचं म्हटलं तर व्यवस्थित पीठ फुलून येत नाही. घरी बनवलेल्या इडल्या सॉफ्ट होण्यासाठी आणि इडलीचं पीठ फुलण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (Make fermented idli batter in easy steps)

इडल्या सॉफ्ट, जाळीदार होण्यासाठी टिप्स

१)  इडली सॉफ्ट, स्पॉन्जी असावी असं तुम्हाला वाटत असेल तर तांदळाची निवड योग्य असायला हवी.  इडलीचं बॅटर तयार करण्यासाठी बासमती तांदळाचा वापर कधीही करू नका.  

२) इडलीचे तांदूळ वापरत असाल पार्बोल्ड राइसचा वापर करा. लांब तांदूळ वापरणे टाळा आणि त्याऐवजी मध्यम- लहान तांदूळ निवडा.

३) डाळी आणि तांदूळ भिजवल्यानंतर बारीक करता तेव्हा त्या वेळी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. उदाहरणार्थ, आपण फूड प्रोसेसरऐवजी ग्राइंडर वापरू शकता. त्याचप्रमाणे बारीक करताना बर्फाचे थंड पाणी घालावे. 

४) मिश्रण दळताना थंड पाणी घालणे महत्वाचे आहे कारण मिश्रण दळताना ते गरम नसावे. पीठ एकतर थंड किंवा खोलीच्या तपमानावर असावे.

५) इडलीचा लवचिकपणा व्यवस्थित ठेवायचा असेल तर मेथी दाणे तुम्हाला नक्कीच खूप मदत करू शकता.  मेथीच्या दाण्यांमुळे पीठ लवकर आंबतं पण याचा जास्त वापर करू नका अन्यथा पीठ कडवट लागेल.

६) साहित्य बारीक केल्यानंतर आणि आंबवण्याआधी हाताच्या मदतीने चांगले फेटा. असे केल्याने, मिश्रणात पुरेशी हवा येते, ज्यामुळे इडली मऊ होण्यास मदत होते. यासाठी किमान 5 मिनिटे सतत हाताने पिठ मिसळा. 

७) पीठ झाकणाने झाकून ठेवा आणि आंबायला ठेवा. प्लास्टिक किंवा हवाबंद कंटेनर वापरू नका याची खात्री करा. यासाठी स्टीलची भांडी सर्वोत्तम मानली जातात.

८) डाळी भिजवताना पूर्ण काळजी घेतली पाहिजे. इडली पिठात 2:1 गुणोत्तर योग्य मानले जाते. म्हणजेच प्रत्येक दोन कप तांदळासाठी एक वाटी डाळ वापरावी लागेल.

Web Title: Cooking Hacks & Tips : How To Make A Perfect Idli Batter In Simple Steps 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.