Lokmat Sakhi >Food > एकदाच १० मिनिटांत करुन ठेवा चमचमीत वाटण, अर्ध्या तासात होईल मस्त स्वयंपाक

एकदाच १० मिनिटांत करुन ठेवा चमचमीत वाटण, अर्ध्या तासात होईल मस्त स्वयंपाक

Cooking Hacks & Tips :

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 05:35 PM2023-05-22T17:35:30+5:302023-05-22T17:45:07+5:30

Cooking Hacks & Tips :

Cooking Hacks & Tips : How to make premix for vegetables | एकदाच १० मिनिटांत करुन ठेवा चमचमीत वाटण, अर्ध्या तासात होईल मस्त स्वयंपाक

एकदाच १० मिनिटांत करुन ठेवा चमचमीत वाटण, अर्ध्या तासात होईल मस्त स्वयंपाक

रोज मुलांच्या शाळेचे आणि ऑफिसचे डबे बनवायचे म्हणजे मोठं टेंशन असतं. रोजच्या जेवणात काय बनवावं कळत नाही.  डब्यात काहीतरी वेगळं चविष्ट असावं अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. (Kitchen Tips & Hacks) सकाळी घाईच्या वेळी भाज्या पटापट बनवून होण्यासाठी तुम्ही आधीच वाटण तयार करून ठेवलं काम पटापट होईल आणि अधिक चवदार पदार्थ तयार होतील. (Cooking Hacks & Tips) रोजच्या भाज्या चविष्ट आणि कमी वेळात तयार होण्यासाठी वाटणाची रेसिपी पाहूया. 

साहित्य

१) धणे- २ टेस्पून
२) जिरे -२ टेस्पून
३) पांढरे तीळ- १ टीस्पून. 
४) दालचिनी- १ इंच
५) तेल- ४-५ चमचे. 
६) भाजलेले खोबरे- 100 ग्रॅम 
७) कांदे- ३ मोठे चिरलेले
८) लसूण पाकळ्या- २५ ते ३०
९) आले- ३ इंच
१०) ताजी कोथिंबीर -१/४ कप
११) मीठ -चवीनुसार

कृती (How to make premix for vegetables)

रोजच्या भाज्यांचे वाटण करण्यासाठी सगळ्यात आधी कढई गरम करून त्यात २ चमचे धणे, २ चमचे जीरं, १ चमचा पांढरे तीळ, १ चमचा दालचिनी घालून परतून घ्या. मंच आचेवर भाजल्यानंतर हे पदार्थ एका ताटात काढून घ्या. नंतर एका कढईत किसलेल सुकं खोबर भाजून घ्या.

एक चमचा तेलात ३ मोठे चिरलेले कांदे तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. कांदा लालसर होत आला की त्यात सोललेल लसूण, आणि बारीक चिरलेलं आलं आणि २ मिनिटे अजून भाजून घ्या भाजलेलं मिश्रण एका ताटात काढा. एका मिक्सरच्या भांड्यात  सुरूवातीला भाजलेले मसाले आणि कांदे, खोबरं, लसूण, पाव वाटी कोथिंबार, मीठ घालून मिक्समध्ये बारीक करून घ्या. या मिश्रणात जराही पाणी घालू नका. हवंतर तुम्ही यात २ ते ३ चमचे तेल घालू शकता.

बारीक दळल्यानंतर हे वाटण एका स्वच्छ डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेवा आणि गरज लागेल तसं वापरा, जवळपास १० दिवस हे वाटण चांगलं राहतं. महाराष्ट्रीयन पद्धतीची कोणतीही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तेलात मोहोरी, जीरं, कढीपत्ता घातल्यानंतर गरजेनुसार  २ ते ३ चमचे हे वाटण घालून परतून घ्या नंतर भाजी घाला. या पद्धतीमुळे स्वयंपाकाचा वेळ वाचेल आणि कमीत कमी वेळात उत्तम पदार्थ तयार होईल.

Web Title: Cooking Hacks & Tips : How to make premix for vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.