Lokmat Sakhi >Food > डाळ शिजवताना थंड पाणी घालता की गरम? १ सोपी ट्रिक, रोजच्या वरणाची चव वाढेल

डाळ शिजवताना थंड पाणी घालता की गरम? १ सोपी ट्रिक, रोजच्या वरणाची चव वाढेल

Cooking Hack : अधिकाधिक घरांमध्ये तुरीच्या डाळीचं वरण बनवलं जातं. तुरीच्या डाळीबरोबर मुगाच्या, मसूरच्या अशा वेगवेगळ्या डाळींचे वरण खाल्ले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 08:45 AM2024-03-18T08:45:00+5:302024-03-18T16:28:49+5:30

Cooking Hack : अधिकाधिक घरांमध्ये तुरीच्या डाळीचं वरण बनवलं जातं. तुरीच्या डाळीबरोबर मुगाच्या, मसूरच्या अशा वेगवेगळ्या डाळींचे वरण खाल्ले जाते.

Cooking Hacks : Why Should Never Pour Cold Water in Dal Best Way To Prepare Indian Dal | डाळ शिजवताना थंड पाणी घालता की गरम? १ सोपी ट्रिक, रोजच्या वरणाची चव वाढेल

डाळ शिजवताना थंड पाणी घालता की गरम? १ सोपी ट्रिक, रोजच्या वरणाची चव वाढेल

तुरीची डाळ, भात, चटणी, दही आणि आणि बटाट्याची भाजी हा परफेक्ट जेवणाचा मेन्यू आहे. काही नसले तरी रोजच्या जेवणात  वरण भात असतोच. (How To Make Dal Simple Dal Recipe) वरण तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता यावर वरणाची चव कशी लागेल ते अवलंबून असते. अधिकाधिक घरांमध्ये तुरीच्या डाळीचं वरण बनवलं जातं. तुरीच्या डाळीबरोबर मुगाच्या, मसूरच्या अशा वेगवेगळ्या डाळींचे वरण खाल्ले जाते. (Best Way To Prepare Indian Dal)

प्रत्येक घरांत वरण बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काहीजणांना मसालेदार वरण आवडते तर काहीजण साधं वरण खाणं पसंत करतात. (How to Cook Dal) हिंग, जीरं किंवा तुपाची फोडणी  दिल्यास वरणाची  चव दुप्पटीने वाढते. लाल मिरचीचा आहारात समावेश करा. वरण बनवताना काही चुका केल्यास वरणाची चव बिघडू शकते. डाळ बनवण्यासाठी लहान-सहान गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. वरण बनवण्याची योग्य पद्धत, चव आणि पोषण यामुळे गडबड होऊ शकते.

वरणात कॉर्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते.  जेवण बनवताना आपण त्यात गरम पाणी घालतो तेव्हा त्यातील स्टार्च प्रोटीन कमी करते. यामुळे डाळ मऊ होते आणि टेक्स्चर बदलते. यामुळे स्वादही बदलतो. पाण्याचं तापमान डाळीच्या चवीसाठी फार महत्वाचं असतं. थंड पाण्यामुळे डाळीची चव बिघडू शकते. कारण डाळ चविष्ट होत नाही. थंड पाणी घातल्यामुळे डाळीचे टेक्चर खराब होऊ शकते.

कंबर दुखते-थकवा जाणवतो? मूठभर शेंगदाणे नियमित खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा कमी 

डाळीत थंड पाणी मिसळा

आधीच डाळीत थंड पाणी मिसळ्यामुळे या मिश्राणाचे तापमान कमी होते. ज्यामुळे जेवण बनवण्याची प्रक्रिया मंद होते.  डाळ शिजवण्यास जास्त वेळ लागतो. जेव्हा डाळ कच्ची आणि अर्धवट शिजलेली असते तेव्हा थंड पाणी हे डाळ कमी शिजण्याचं कारण असू शकतं. जेव्हा तुम्ही मंद आचेवर डाळ शिजवता तेव्हा त्यातील  प्रोटीन्स आणि फायबर्स वाढतात.

थंड पाणी मिसळल्याने तापमान थंड होते आणि या प्रक्रियेत अडथळे येतात आणि डाळ कच्ची राहते आणि डाळीवर फेस जमा होऊ लागतो. थंड पाणी घातल्याने डाळीचे टेक्स्चर बिघडू शकते. नेहमी गरम पाण्याचा डाळ बनवण्यासाठी वापर करा. डाळ भिजवण्याच्या आधी पाण्यात भिजवून घ्या. डाळ २ ते ३ वेळा व्यवस्थित धुवून  घ्या. त्यातील स्टार्च  स्वच्छ होण्यास होते. डाळ भिजवण्यासाठी सामान्य पाण्याचा वापर करा. 

प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवायला ठेवताना  त्यात थोडं पाणी जास्त घाला. गरज पडल्यास थंड पाण्याचा वापर करू शकता.  डाळ शिजवताना अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते.  पाणी गरम करून डाळीत घाला.  ज्यामुळे जेवण बनवण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत नाहीत आणि डाळीची चवही चांगली राहते. डाळीत पाणी घालताना आच उच्च असू नये मंच आचेवर डाळ शिजवा. डाळीचं तापमान नियंत्रणात ठेवा.

Web Title: Cooking Hacks : Why Should Never Pour Cold Water in Dal Best Way To Prepare Indian Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.