Lokmat Sakhi >Food > Cooking Oil Health Risks : तेल है या जहर? जास्त तेल तापवणे, तेलाचा धूर आरोग्याला घातक; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

Cooking Oil Health Risks : तेल है या जहर? जास्त तेल तापवणे, तेलाचा धूर आरोग्याला घातक; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

Cooking Oil Health Risks : does heating oil make it unhealthy : कुरकुरीत पदार्थांसाठी तेल जास्तवेळ तापत ठेवताय? जास्त गरम केल्यानं तेल बनतंय जहर; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 02:01 PM2021-12-14T14:01:35+5:302021-12-14T14:14:18+5:30

Cooking Oil Health Risks : does heating oil make it unhealthy : कुरकुरीत पदार्थांसाठी तेल जास्तवेळ तापत ठेवताय? जास्त गरम केल्यानं तेल बनतंय जहर; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

Cooking Oil Health Risks : Heating oil too much become risky health expert shares why you should not burn it beyond smoking point | Cooking Oil Health Risks : तेल है या जहर? जास्त तेल तापवणे, तेलाचा धूर आरोग्याला घातक; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

Cooking Oil Health Risks : तेल है या जहर? जास्त तेल तापवणे, तेलाचा धूर आरोग्याला घातक; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

सध्या निरोगी राहण्यासाठी, आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते.  तेलांच्या वापरावर अनेकदा वाद होतात. कारण हृदयविकार, मधुमेह आणि चयापचय विकारांची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, कोणते तेल किंवा तूप जास्त फायदेशीर आहे, कमी हानीकारक आहे, असे तर्कही लावले जातात. (Cooking Oil Health Risks) पण आज वादाचा मुद्दा हा नाही की कोणते तेल किंवा तूप तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे. त्यापेक्षा तेल किंवा तूप कितपत तापवले पाहिजे जेणेकरून ते हानिकारक ठरणार नाही. हे सुद्धा माहित असायला हवं (Does heating oil make it unhealthy)

अनेक घरांमध्ये  देशी तूप, ऑलिव्ह ऑईल, शेंगदाणा तेल आणि मोहरीच्या तेलातूनच अन्न शिजवले जाते. रोजच्या जेवणात कोणते तेल वापरले जात आहे, ते तुम्ही किती तापवता हे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकूणच, जास्त तापवलेले तेल तुमच्या समस्या वाढवू शकते. जेवणासाठी कितीवेळ तेल तापवायला हवं हे माहीत करून घेऊया. 

तज्ज्ञ काय सांगतात?

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, जेव्हा तुम्ही अन्न शिजवण्यासाठी तेल गरम करता तेव्हा त्यातून लगेच धूर निघत नाही. पण काही वेळ गॅसवर ठेवल्यावर त्यातून धूर निघू लागतो. अनेक वेळा तज्ञांनी या धुराबाबत लोकांना सावध केले आहे. तज्ज्ञांच्या मते, तेल जास्त गरम केल्यानंतर किंवा स्मोकिंग पॉईंटवर शिजवल्यानंतर ते नुकसानकारक ठरते. या स्मोकिंग पॉईंटच्या संदर्भात टाइम्स नाऊ डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत, फोर्टिस हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ रिंकी कुमारी यांनी आरोग्यावर त्याचे काही परिणाम सांगितले आहेत.

रिंके म्हणतात की तेल हा एक  नॉन-पोलर रासायनिक घटक आहे, जो हायड्रायकार्बनपासून बनलेला आहे आणि ते हायड्रोफोबिक आणि लिपोफिलिक आहे. म्हणजेच तेल पाण्यात मिसळत नाही आणि त्यामुळे लठ्ठपणाही होऊ शकतो. बहुतेक तेलं ज्वलनशील असतात आणि पृष्ठभागावर सक्रिय राहतात. रूम टेम्परेचर हे सर्व तेले अनसैचुरेटेड लिपिड स्वरूपात असतात. पण गरम होताच कालांतराने ते खराब होऊ लागतात. कारण कालांतराने त्यांचे पोषक आणि फायटोकेमिकल्स पूर्णपणे नाहीसे होऊ लागतात. दुसरीकडे, जेव्हा तेल खूप गरम होते, तेव्हा ते फ्री रॅडिकल्स सोडू लागते ज्यामुळे विषारी वायू तयार होतो.

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तेल जास्त तापायला लागते तेव्हा त्यातून बाहेर पडणारा वायू स्पष्टपणे दिसू शकतो. हा उत्सर्जित होणारा वायू म्हणजे तेल आता कमी होऊ लागले आहे याचा पुरावा आहे. खरं तर, याचवेळेत  तेलापासून काही वायू आणि फ्री रॅडिकल्स तयार होतात, जे मानवी शरीरासाठी खूप हानिकारक असतात. शिवाय, जेव्हा तेल जास्त तापते तेव्हा ते खराब होते आणि पोषक तत्व आणि चव दोन्ही गमावते. त्याच वेळी, ते कॅन्सरसाठी जबाबदार असलेल्या रसायनांना प्रोत्साहन देते.

तेल जास्त गरम झाल्यावर विषारी ठरू शकतं

याशिवाय, तज्ञ म्हणतात की जेव्हा तेल कमी होते तेव्हा प्रथम हायड्रोपेरॉक्साइड तयार होते आणि त्यानंतर ते अॅल्डिहाइडला प्रोत्साहन देते. अल्डीहाइड हे एक विषारी रसायन आहे जे पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणावाचे चिन्ह असल्याचे दर्शविले गेले आहे. याशिवाय, हे नंतर डिजनरेटिव्ह डिसऑर्डरचे कारण बनते. यासोबतच तज्ज्ञांनी तेलांचे स्मोकिंग पॉईंट कमी आणि जास्त स्मोकिंग पॉईंटही सांगितले आहेत.

उच्च स्मोकिंग पॉइंट ऑइल म्हणजे 400 डिग्री फॅरेनहाइट किंवा त्याहून अधिक तापमानापर्यंत तळण्यासाठी वापरता येणारे तेल.

१) avocado तेल

२)  कॅनोला तेल

३) कॉर्न तेल

४) शेंगदाणे तेल

ही तेलं फक्त 225 अंश फॅरेनहाइट वर किंवा त्यापेक्षा कमी उष्णतेवर तापवले जातात

१) फ्लेकसिड्स ऑईल

२) भोपळ्याच्या बियांचे तेल

३) अक्रोड तेल. तुम्ही यापैकी कोणतेही तेल स्वयंपाकासाठी वापरू शकत नाही. सॅलेडमध्ये किंवा सजावटीसाठी तुम्ही या तेलांचा वापर करू शकता. 

Web Title: Cooking Oil Health Risks : Heating oil too much become risky health expert shares why you should not burn it beyond smoking point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.