Join us  

घरात कितीजण राहतात, स्वयंपाकासाठी तेल किती वापरता? स्वंयपाकासाठी बेस्ट तेल कोणतं? तज्ज्ञ सांगतात....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 3:58 PM

Cooking Oils that are Healthy : या तेलाच्या प्रोसेसिंग प्रक्रियेदरम्यान निकेल रिलिज होते. हे रसायन शरीरसाठी हानीकारक ठरू शकते.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टीक आहार (Healthy Diet) घेणं गरजेचं असतं. आरोग्य तज्ज्ञांच्यामते जेव्हा पौष्टीकतेबाबत विचार केला जातो तेव्हा तुम्ही रोजच्या जेवणात कोणतं तेल वापरता ते फार महत्वाचं असतं. तुम्ही भाज्यांमध्ये जे तेल वापरता याचा परिणाम हृदयावर होतो. (Cooking oils that are healthy) अभ्यासानुसार ऑलिव्ह ऑईलमध्ये अनेक आजार कमी करणारे गुणधर्म असतात. (Best Healthy Cooking Oils, According to Studies) जेवण बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर ठरते. या तेलात मोनोसैचुरेटेड फैटी एसिड्स असतात. जे हृदयाच्या आजारांपासून वाचवतात.

तुलनेने रिफाईंड तेल आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. रिफाईंड तेल हे नैसर्गिक तेलांचे प्रोसेस्ड रूप असते. जे अनेक प्रकारची रसायनं फिल्टर करून तयार होते. हे तेल आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. रिफाईंड ऑईलचे दुष्परिणामही दिसून येतात. (Which oil for cooking is best)

रिफाईंड तेलामुळे आजारांचा धोका टळतो

रोज रिफाईइंड तेलाचा वापर केल्यानं क्रोनिक आजार, डायबिटीज, गॅस्ट्रोइंटेस्टायनर आजार, एथेरोस्क्लेरोसिस, लठ्ठपणा आणि प्रजनजसंबंधी समस्या वाढतात. म्हणूनच आरोग्यतज्ज्ञ कमीत कमी प्रमाणात या तेलाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. 

रिफाईंड ऑईलमुळे शरीरातील इंफ्लामेटरी समस्या वाढतात. रिफाईंड ऑईलमध्ये ट्रांस फॅट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे हृदय रोग आणि कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत होते. ट्रांस फॅट महिलांमध्ये सूज आणि वजन वाढवण्याचे कारण ठरू शकतात. डायबिटीज आणि हृदयाच्या आजारांचाही धोका वाढतो. 

या तेलाच्या प्रोसेसिंग प्रक्रियेदरम्यान निकेल रिलिज होते. हे रसायन शरीरसाठी हानीकारक ठरू शकते.  हा धातू आरोग्यासाठी हानीकारक ठरतो. यामुळे लिव्हर, त्वचा आणि श्वसन प्रणालीवर चुकीचा परिणाम होतो.  अभ्यासानुसार रिफाईंड तेलांत मधुमेह, कॅन्सर आणि हृदयाच्या समस्या  वाढवणारे गुणधर्म असतात. 

आरोग्यतज्ज्ञांच्यामते या आजारांचा धोका टाळण्यासाठी आहारात पौष्टीक तेलांचा समावेश करा. ऑलिव्ह ऑईल आणि मोहोरीचे तेल तब्येतीसाठी गुणकारी ठरते. कोलेस्टेरॉल आणि  फॅट फ्री पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.

तिळाचे तेल

तिळाचे तेल चवीलाही उत्तम असते. तिळाच्या तेलात अनेक आजारांशी लढण्याची क्षमता असते. तिळाचे तेल स्वयंपाकात वापरल्यास आजारांपासून लांब राहता येते. याशिवाय एनिमिया, कॅन्सरपासून बचाव होतो आणि शुगर नियंत्रणात राहते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न