फ्रायम्स हा पदार्थ जेवणासोबत आवडीने खाल्ला जातो. उन्हाळ्यात पापड्या, फ्रायम्स, चकल्या, कुरड्या असे पदार्थ बनवून डब्यात साठवून ठेवले जातात. फ्रायम्सचं नाव ऐकताच प्रत्येकाला, हा पदार्थ खाण्याची इच्छा होते. घरी बनवलेले फ्रायम्स तेलात तळल्यानंतर चौपटीने फुलतात. मात्र, हे फ्रायम्स तळताना बरेच तेल शोषून घेते. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. याच्या नियमित सेवनामुळे शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.
आपण हे फ्रायम्स तेलाचा एकही थेंबाचा वापर न करता तयार करू शकता. काही ट्रिक्स फॉलो करा. ज्यामुळे हे फ्रायम्स चौपटीने फुलतील व चवीलाही क्रिस्पी - उत्तम लागतील. चला तर मग कोणते आहेत ते ट्रिक्स पाहूयात.
ड्राय फ्राय
अनेकदा रस्त्यामधून जात असताना, आपल्याला कोपऱ्यात एक गाडा घेऊन उभा असलेला माणूस दिसतो. तो मिठाच्या मदतीने कढईत फ्रायम्स भाजून घेतो. परंतु, ही ट्रिक प्रत्येकाला माहित आहे असे नाही. आपण देखील या ट्रिकचा वापर करून घरी फ्रायम्स तयार करू शकता.
ड्राय फ्रायमध्ये फ्रायम्स भाजण्याची पद्धत
एका जाड तळाच्या पॅनमध्ये १ कप मीठ घ्या. ते मीठ थोडा वेळ पॅनमध्ये गरम करत ठेवा. आता त्यात फ्रायम्स घाला आणि फुगेपर्यंत ढवळत राहा. अशा प्रकारे तेलाशिवाय तळलेले फ्रायम्स खाण्यासाठी तयार. आपण हे फ्रायम्स भाजून प्लास्टिक अथवा डब्यात साठवून ठेऊ शकता.
मायक्रोवेव्ह फ्राय
आजकाल बहुतांश घरांमध्ये मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. पण बहुतेक लोकं त्यात अन्न गरम करतात किंवा केक बनवतात. परंतु आपण मायक्रोवेव्हचा वापर अनेक पाककृतींसाठी देखील करू शकता. आपण त्यात फ्रायम्स देखील भाजून घेऊ शकता.
मायक्रोवेव्हमध्ये फ्रायम्स तयार करण्याची पद्धत
सर्वप्रथम, मायक्रोवेव्ह प्लेट घ्या, त्यात फ्रायम्स अंतर ठेऊन सुटसुटीत ठेवा. आता ही प्लेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि 30 सेकंदावर सेट करा. त्यानंतर एकदा बाहेर काढा आणि पुन्हा ३० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. अशाप्रकारे तेलाचा वापर न करता, कुरकुरीत आणि स्वादिष्ट फ्रायम्स खाण्यासाठी रेडी.
वांग्याचे काप करण्याची पारंपरिक खमंग रेसिपी! तोंडाला चव येईल असा मस्त झटपट पदार्थ
एअर फ्रायर
बहुतांश लोकं ऑइल फ्री खाणं पसंद करतात. त्यामुळे अनेकांकडे एअर फ्रायर ही मशीन उपलब्ध असते. यात तेलाशिवाय पदार्थ तयार होतो. आपण यात फ्रायम्स देखील तयार करू शकता.
एअर फ्रायर फ्रायम्स तळण्याची पद्धत
एअर फ्रायरमध्ये तळण्यासाठी, सर्वप्रथम त्याच्या बॉक्समध्ये थोडेसे फ्रायम्स ठेवा. फ्रायम्सवर हलक्या हाताने ब्रशने तेल लावा. जास्त तेल लावू नये. यानंतर फ्रायम्स एअर फ्रायरमध्ये २ मिनिटे ठेवा. अशा प्रकारे फुगलेले आणि कुरकुरीत फ्रायम्स खाण्यासाठी रेडी.