हिवाळ्यात शरीराला गरम ठेवणारे पदार्थ जास्त खाल्ले जातात. मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू यांसह हिवाळ्यात चपात्यांपेक्षा भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. (Cooking Tips and Tricks) तांदळाच्या भाकरीच्या तुलनेत बाजरीची भाकरी थंडीत खाल्ल्यास शरीराला खूप फायदे मिळतात. याव्यतिरिक्त बाजरीत व्हिटामीन बी, फायबर्स, कार्ब्स, आयरन आणि फायटेट, फिनोल, टॅनिन असे एंटीऑक्सिडेंट असतात. हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीर आतून उबदार राहते, तसेच शरीर अनेक आजारांपासून वाचते. याशिवाय पचनक्रिया सुधारते. बाजरीची भाकरी डाळ, भाजी, चटणी, ठेचा इत्यादींसोबत खाऊ शकता. येथे जाणून घ्या बाजरीच्या भाकरीचे फायदे ( 4 benefits of bajra roti you need to know about Bajra roti benefits)
1) गॅसचा त्रास दूर होतो
बाजरीचे पीठ ग्लूटेन मुक्त आणि फायबरने समृद्ध आहे. हिवाळ्यात बाजरीची भाकरी रोज खाल्ल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
2) वेट लॉस आणि डायबिटीस
बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते, अशा स्थितीत तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय हे पीठ प्री-बायोटिकचे काम करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते.
3) ओमेगा ३ फॅटी एसिडनं भरपूर
ओमेगा ३ फॅटी अॅसिड प्रत्येकाच्या शरीरासाठी आवश्यक असते. हे शरीरातील पेशींना बरे करण्याचे काम करते. परंतु शरीर ते स्वतः बनवू शकत नाही. हे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत, जे अन्नपदार्थांमधून घेतले जाऊ शकतात. पण बाजरीचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला ओमेगा ३ मिळते. तज्ज्ञांच्या मते, इतर धान्यांपेक्षा बाजरीच्या पिठात जास्त ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळते. बाजरीत असे अनेक गुणधर्म आहेत, जे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास उपयुक्त मानले जातात. अशावेळी किडनी आणि लिव्हरशी संबंधित समस्यांना आळा बसतो, तसेच तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
4) हृदयाचे आरोग्य चांगले राहते
बाजरीत मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. अशा स्थितीत ही बाजरीची भाकरी बीपी आणि हृदयाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बाजरीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.