Join us  

Cooking Tips : जेवण करताना या ४ पद्धतीनं तुप वापरा; स्वयंपाक होईल दुप्पट चविष्ट, लज्जतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 1:30 PM

Cooking Tips : तुम्ही कोणतीही डाळ बनवत असाल तर सर्वप्रथम ती कुकरमध्ये उकळा. उकळलेली डाळ तूप टाकून शिजवल्याने खूप चवदार होईल.

तूप खायला सगळ्यांनाच आवडतं, मग ते डाळीत, खिचडीत असो किंवा पुलावात. जेवणाची चव वाढवण्यासोबतच तूप आरोग्यासाठीही उत्तम आहे. बाजारात उपलब्ध तेल किंवा रिफाइंड तेलाचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. म्हणूनच आपण तुपात अन्न शिजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोजचं जेवण तुपात शिजवणे कठीण असते, म्हणूनच या लेखात तुपात जेवण करण्याचे काही सोपे मार्ग पाहूया. जेणेकरून जास्त तूप न वापरता जेवण स्वादीष्ट, लज्जतदार होईल. (4 ways to use ghee in food)

डाळ उकळल्यानंतर तूप घाला

जर तुम्ही कोणतीही डाळ बनवत असाल तर सर्वप्रथम ती कुकरमध्ये उकळा. उकळलेली डाळ तूप टाकून शिजवल्याने खूप चवदार होईल. जर तुम्ही चना डाळ बनवत असाल तर तुम्ही त्यातही हीच पद्धत अवलंबू शकता.

प्रोटिन्सचा खजिना आहेत ६ व्हेज पदार्थ; रोज खा, मांसाहारापेक्षा जास्त प्रोटिन मिळेल

जेवण तयार झाल्यानंतर वरून तूप घाला

जर तुम्हाला सुरुवातीला जेवणात तूप मिसळायचे नसेल तर तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता. प्रथम तुम्ही डाळ किंवा भाजी करा. सर्वात शेवटी एका छोट्या कढईत तूप टाकून त्यात कोरड्या लाल मिरच्या आणि हिंग टाकून फोडणी तयार करा. यामुळे जेवणाची चव दुपटीने वाढते आणि जेवणही छान जातं. 

डाळ  तूपात भाजून घ्या

डाळीची चव वाढवण्यासाठी तुम्ही ही पद्धत देखील अवलंबू शकता. जर तुम्ही डाळ बनवणार असाल तर धुण्यापूर्वी ती नीट स्वच्छ करा. स्वच्छ केलेली डाळ एका पातेल्यात तुपात भाजून घ्या. भाजलेली डाळ जेवणाला चांगली चव देईल.

जिने चढताना, धावताना खूप दम लागतो? खा ५ पदार्थ, स्टॅमिना वाढेल, ठणठणीत राहाल

कणीक मळल्यानंतर तूप वापरा

अनेकदा मळलेले पीठ काही काळ सोडल्यावर त्यावर पिवळसर थर येऊ लागतो . अशा स्थितीत मळलेल्या पिठावर तूप लावून ठेवू शकता. असे केल्याने पिठावर डाग पडत नाही. चपाती चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही चपातीवर चांगले तूप लावून सर्व्ह करू शकता.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न