Lokmat Sakhi >Food > Cooking Tips : उन्हाळ्यातही लिंबू रसरशीत राहावीत, पटकन सुकू नयेत म्हणून ५ सोपे उपाय

Cooking Tips : उन्हाळ्यातही लिंबू रसरशीत राहावीत, पटकन सुकू नयेत म्हणून ५ सोपे उपाय

Cooking Tips : लिंबू वाळून वाया जाण्यापेक्षा आपल्या पोटात जावे यासाठी म्हणून लिंबू साठवण्याच्या सोप्या पद्धती पाहूया....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 11:15 AM2022-03-11T11:15:56+5:302022-03-11T11:22:22+5:30

Cooking Tips : लिंबू वाळून वाया जाण्यापेक्षा आपल्या पोटात जावे यासाठी म्हणून लिंबू साठवण्याच्या सोप्या पद्धती पाहूया....

Cooking Tips: 5 Simple Remedies To Keep Lemon Juicy Even In Summer | Cooking Tips : उन्हाळ्यातही लिंबू रसरशीत राहावीत, पटकन सुकू नयेत म्हणून ५ सोपे उपाय

Cooking Tips : उन्हाळ्यातही लिंबू रसरशीत राहावीत, पटकन सुकू नयेत म्हणून ५ सोपे उपाय

Highlightsवाळलेल्या लिंबाचा रस हा आंबट न लागता त्याला कडसर चव येते. हे कडक झालेले लिंबू पिळायला त्रास पडत असल्याने आपण ते फेकून देतो. लिंबांना तेल लावून एखाद्या हवाबंद कोरड्या डब्यात ठेवा, यामुळे लिंबू चांगले टिकतात. 

लिंबामध्ये सी व्हॅटॅमिन असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते हे आपल्याला माहित आहे. लिंबामुळे आरोग्याच्या सामान्य समस्यांबरोबरच हृदयरोगावर नियंत्रण येणे, संसर्गजन्य आजारांपासून सुटका होणे असे फायदे होतात. इतकेच नाही तर लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्वचा आणि केसांच्या सौंदर्यातही लिंबाचा चांगला उपयोग होतो. लिंबू बाहेर ठेवा किंवा फ्रिजमध्ये ते वाळून जातेच. उन्हाळ्यात आपण आवर्जून लिंबू सरबत पितो. विविध पदार्थांवर लिंबू पिळून घेतल्याने त्याचा स्वाद तर वाढतोच पण पौष्टीकताही वाढते (Cooking Tips ). या कारणामुळे आपण बाजारातून लिंबू आणतो. 

पण उन्हामुळे ते अगदी दोन ते तीन दिवसातच कडक होते आणि वाळून जाते. असे कडक झालेले लिंबू चिरताही येत नाही आणि त्यातून म्हणावा तसा रसही निघत नाही. इतकेच नाही तर वाळलेल्या लिंबाचा रस हा आंबट न लागता त्याला कडसर चव येते. हे कडक झालेले लिंबू पिळायला त्रास पडत असल्याने आपण ते फेकून देतो. पण त्यामुळे पैसे तर वाया जातातच पण लिंबूही वाया जाते. लिंबू वाया न जाता ते आपल्या पोटात गेले तर पोटाच्या समस्यांसाठी, शुगर कमी होण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे लिंबू वाळून वाया जाऊ नये म्हणून लिंबू साठवण्याच्या सोप्या पद्धती पाहूया (How to store lemon)....

(Image : Google)
(Image : Google)

१. लिंबाचा रस काढणे ही लिंबू साठवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. बाजारातून लिंबं आणली की ती कापून एका बाटलीत किंवा बरणीत या लिंबांचा रस काढून ठेवल्यास त्याचा हवा तेव्हा उपयोग करता येतो. सध्या आपल्या सगळ्यांकडेच फ्रिज वापरला जात असल्याने हा रस फ्रिजमध्ये अगदी चांगला टिकतो. 

२. लिंबाच्या फोडी करुन त्या एका डब्यात भरुन ठेवल्यास त्या चांगल्या राहतात. मात्र हा डबा हवाबंद असायला हवा आणि तो फ्रिजमध्ये ठेवायला हवा. आपल्या गरजेनुसार या फोडी आपण वापरु शकतो. 

३. इतकेच नाही तर तुम्हाला लिंबाचा रस जास्त काळ टिकवायचा असेल तर तो तुम्ही फ्रिजरमध्येही ठेवू शकता. काहीवेळा लिंबू खूप स्वस्त मिळतात अशावेळी रस काढून हा रस फ्रिजरमध्ये ठेवल्यास तो कित्येक महिने टिकतो. मात्र वापरायचा असेल तेव्हा थोडा आधी हा रस बाहेर काढून ठेवल्यास तो वापरणे सोपे जाते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. लिंबू वाळून थोडे कडक होण्यास सुरुवात झाली असेल तर कोमट पाण्यात ही लिंबं टाकून ठेवा. ती आपोआप मऊ होतात आणि सहज चिरता येतात. त्यातून हवा तसा रसही काढता येतो. 

५. जास्त ऊब असलेल्या ठिकाणी किंवा प्लास्टीकच्या पिशवीमध्ये इतर भाजीपाल्यासोबत लिंबू ठेवणे टाळावे. त्याऐवजी लिंबांना तेल लावून एखाद्या हवाबंद कोरड्या डब्यात ठेवा, यामुळे लिंबू चांगले टिकतात. 

 

 

Web Title: Cooking Tips: 5 Simple Remedies To Keep Lemon Juicy Even In Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.