Lokmat Sakhi >Food > भेंडीची भाजी नेहमी चिकट-गचगचीत होते? ४ टिप्स, कुरकुरीत-चविष्ट होईल भेंडी

भेंडीची भाजी नेहमी चिकट-गचगचीत होते? ४ टिप्स, कुरकुरीत-चविष्ट होईल भेंडी

Cooking Tips and Hacks : भेंडी चिकट होऊ नये यासाठी काही सोप्या कुकींग टिप्स फायदेशीर ठरू शकतात. (Cooking Hacks & Tips)

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 03:03 PM2023-07-19T15:03:35+5:302023-07-19T16:30:02+5:30

Cooking Tips and Hacks : भेंडी चिकट होऊ नये यासाठी काही सोप्या कुकींग टिप्स फायदेशीर ठरू शकतात. (Cooking Hacks & Tips)

Cooking Tips and Hacks : Easy Tips To Fix Your Sticky Bhindi While Cooking | भेंडीची भाजी नेहमी चिकट-गचगचीत होते? ४ टिप्स, कुरकुरीत-चविष्ट होईल भेंडी

भेंडीची भाजी नेहमी चिकट-गचगचीत होते? ४ टिप्स, कुरकुरीत-चविष्ट होईल भेंडी

भेंडीची भाजी खायला चविष्ट असते पण कापणं आणि शिजवणं कठीण असतं. कारण जेव्हाही भेंडी कापली जाते तेव्हा भेंडीतून चिकट पदार्थ निघतो. जरी कापताना भेंडी कोरडी असतील तरी  शिजवताना त्यातून चिकट पदार्थ बाहेर येतो. (Four Clever Tips To Prevent Bhindi From Turning Sticky) यामुळेच अनेकांना भेंडी खायला अजिबात आवडत नाही. जर भेंडी कुरकुरीत असेल तर खाणारेही आवडीने खातात. भेंडी चिकट होत असेल तर काही सोप्या कुकींग टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात.  (Easy Tips To Fix Your Sticky Bhindi While Cooking)

भेंडी चिकट होते कारण त्यात म्यूसिलेज नावाचा चिकट पदार्थ असतो. हा पदार्थ आणि अनेक वनस्पतींमध्ये दिसून येतो. हा पदार्थ एलोवेरामध्येही दिसून येतो. या पदार्थाने रोपाची चांगली वाढ होण्यास मदत होते. रोपाच्या विकासासाठी हे गरजेचे असते. या पदार्थानं नवीन अंकुर फुटण्यासही मदत होते. भेंडी चिकट होऊ नये यासाठी काही सोप्या कुकींग टिप्स फायदेशीर ठरू शकतात. (Cooking Hacks & Tips)

१) भेंडी धुवून व्यवस्थित सुकवा

भेंडी धुवून लगेच कापू नका. अन्यथा त्यातील पाणी मिसळल्यानं भेंडी जास्त चिकट होते. भेंडीची भाजी धुवून व्यवस्थित सुकवा आणि मग कापा. शक्य असल्यास रात्रीच भेंडी स्वच्छ धुवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी कापा. यामुळे आयत्यावेळी  भेंडी चिकट होणार नाही.

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे १० पदार्थ; रोज खा, निरोगी राहा-हार्ट सांभाळा

२) जास्त बारीक काप करू नका

भेंडीचा चिकटपणा दूर करण्यासाठी मोठ्या तुकड्यांमध्ये कापा आणि मग कमी तेलात फ्राय करा. भेंडीचा चिकटपणा १० ते १५ मिनिटांनी दूर होईल.

३) लिंबाचा रस घाला 

भेंडीची भाजी बनवताना त्यात लिंबाचा रस घाला. लिंबाराचा रस घातल्यानं लिंबातील एसिडिटीक गुण चिकट पदार्थ कमी करतात आणि भेंडी कुरकुरीत होते. याव्यतिरिक्त तुम्ही चिंचेचा रस, दही किंवा आमसूलसुद्धा वापरू शकता. पण सुक्या भाजीत आमसूल घालू नका.  भाजी थोडी ओलसर असेल तर तुम्ही त्यात दही किंवा चिंच वापरू शकता. 

बीपीचा त्रास आहे नाश्त्याला काय खावं सूचत नाही? ६ पदार्थ खा, बीपी राहील नियंत्रणात

४) शेवटी मीठ घाला

भेंडी चिकट होण्याचं आणखी एक कारण मीठ असू शकतं. मीठ घातल्यास पाणी सुटतं आणि भाजी ओलसर होते.  जेवण बनवताना शेवटी मीठ घाला जेणेकरून भाजीचं टेक्स्चर बिघडणार नाही. 

Web Title: Cooking Tips and Hacks : Easy Tips To Fix Your Sticky Bhindi While Cooking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.