Lokmat Sakhi >Food > Cooking Tips and hacks : फक्त २ मिनिटात कोथिंबीर निवडण्याची सोपी ट्रिक; कोथिंबीरची पानं झटपट होतील काढून 

Cooking Tips and hacks : फक्त २ मिनिटात कोथिंबीर निवडण्याची सोपी ट्रिक; कोथिंबीरची पानं झटपट होतील काढून 

Cooking Tips and hacks : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कोथिंबीर काढण्यासाठी एक सोपा हॅक सांगण्यात आला आहे. या पद्धतीनं कोथिंबीर काढणं सोपे काम होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:16 PM2022-04-21T15:16:53+5:302022-04-21T15:18:01+5:30

Cooking Tips and hacks : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कोथिंबीर काढण्यासाठी एक सोपा हॅक सांगण्यात आला आहे. या पद्धतीनं कोथिंबीर काढणं सोपे काम होईल.

Cooking Tips and hacks : Viral video easy hack to remove stem from coriander | Cooking Tips and hacks : फक्त २ मिनिटात कोथिंबीर निवडण्याची सोपी ट्रिक; कोथिंबीरची पानं झटपट होतील काढून 

Cooking Tips and hacks : फक्त २ मिनिटात कोथिंबीर निवडण्याची सोपी ट्रिक; कोथिंबीरची पानं झटपट होतील काढून 

प्रत्येक घरात स्वयंपाक करताना कोथिंबीर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आणि ती भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य गोष्ट मानली जाते. कोथिंबीर प्रत्येक ऋतूमध्ये वापरली जाते आणि चटणीपासून ते डाळींपर्यंत अनेक पदार्थांची चव वाढवते. कोथिंबीरीशिवाय कोणत्याही भाजीची रेसेपी पूर्ण होत नाही.  पण कोथिंबीर धुणं, साफ करणं खूप कठीण काम वाटतं. दिवसभराच्या धावपळीत किचनची लहानमोठी कामं सुद्धा नको वाटतात. (Hacks for coriander leaves) कोथिंबीरशी संबंधित अनेक हॅक आपण दररोज वापरत असतो, परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कोथिंबीर काढण्यासाठी एक सोपा हॅक सांगण्यात आला आहे. या पद्धतीनं कोथिंबीर काढणं सोपे काम होईल. (Viral video easy hack to remove stem from coriander)

१) कोथिंबीर साठवण्याचा सर्वात सोपी आयडीया म्हणजे त्याचे देठं कापून टाकणे. यानंतर, किचन टिश्यूसह प्लास्टिकच्या बॉक्समध्ये गुंडाळा आणि ठेवा.  यासाठी मऊ किचन टिश्यू घ्या, वर्तमानपत्र घेऊ नका. अशाप्रकारे कोथिंबीर फ्रीजमध्ये एका आठवड्यापेक्षा जास्त काळ सहज टिकते. कोथिंबिरीच्या गुच्छात खराब पान असल्यास ते काढून टाका कारण ते संपूर्ण कोथिंबीरीची जुडी खराब करू शकते.

२) जर तुम्हाला कोथिंबीर रूम टेम्परेचरवर ठेवायची असेल तर ते देखील होऊ शकते, परंतु ती फक्त दोन-तीन दिवस ताजे राहू शकते. बाजारातून कोथिंबीर आणली तर त्याच्या मुळापासून पाण्यात टाका.  कोथिंबिरीच्या जु़ड्या मुळांसोबत येतात आणि त्यामुळे कोथिंबीर पाण्यात टाकल्यास बराच काळ ताजी राहू शकते.

३)  तुम्हाला धने पावडर  आवडत नसेल आणि कोथिंबीरीची चव आवडत असेल तर हिरवे धणे सुकवून बारीक करून घ्या. ही कोथिंबीर पूड फारच कमी शिंपडली जाते. ही पावडर जास्त घातल्यास भाजीची चव कडू होऊ शकते. तुम्ही धने पावडर कोणत्याही प्रकारे वापरू शकता. हिरव्या कोथिंबीरपेक्षा थोडी वेगळी चव देईल, पण भाजीमध्ये मसाला म्हणून वापरल्या जाणार्‍या धने पावडरपेक्षाही ही चव वेगळी असेल.

Web Title: Cooking Tips and hacks : Viral video easy hack to remove stem from coriander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.