Lokmat Sakhi >Food > भाजीचा रस्सा पातळ झाला? झटपट 4 उपाय, ग्रेव्ही होईल घट्ट आणि भाजी आणखी चवदार

भाजीचा रस्सा पातळ झाला? झटपट 4 उपाय, ग्रेव्ही होईल घट्ट आणि भाजी आणखी चवदार

Tips To Make Gravy Thick and Tasty Also: भाजीत रस्सा हवा असतो. पण ती जरा जास्तच पातळ होऊन पांचट झाली तर मात्र जेवणाचा मूड जातो. म्हणूनच तर या बघा काही सोप्या ट्रिक्स. ग्रेव्ही होईल घट्ट आणि आणखी चवदार.(4 Ways to Thicken Gravy)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 02:24 PM2022-06-28T14:24:01+5:302022-06-29T14:09:40+5:30

Tips To Make Gravy Thick and Tasty Also: भाजीत रस्सा हवा असतो. पण ती जरा जास्तच पातळ होऊन पांचट झाली तर मात्र जेवणाचा मूड जातो. म्हणूनच तर या बघा काही सोप्या ट्रिक्स. ग्रेव्ही होईल घट्ट आणि आणखी चवदार.(4 Ways to Thicken Gravy)

Cooking Tips And Tricks: How to make gravy thick? What to do if the gravy becomes too thin? | भाजीचा रस्सा पातळ झाला? झटपट 4 उपाय, ग्रेव्ही होईल घट्ट आणि भाजी आणखी चवदार

भाजीचा रस्सा पातळ झाला? झटपट 4 उपाय, ग्रेव्ही होईल घट्ट आणि भाजी आणखी चवदार

Highlightsभाजी जरा जास्तच पांचट झाली, तर जेवणाची मजा गेलीच म्हणून समजा.या काही सोप्या ट्रिक्स वापरून बघा. ग्रेव्ही तर घट्ट होईलच, पण अधिक चवदारही होईल हे नक्की.

एखाद्या दिवशी सुटीचा जेवणाचा छान निवांत बेत असला किंवा मग पाहूणे जेवायला येणार असले तर साधारणपणे वाटून- घाटून मसाल्याच्या भाज्या करण्याचा घाट घातला जातो. एखादी झणझणीत रस्सा भाजी आणि तिच्या जोडीला भाकरी किंवा पोळी आणि भात असा साधाच मेन्यू असला तरीही छान जेवण होतं. पण त्यासाठी भाजीची चव आणि तिच्या ग्रेव्हीचा सरसरीतपणा या दोन्ही गोष्टी मात्र परफेक्ट जमून यायला पाहिजेत. नेमकं इथेच गडबड झाली (How to make gravy thick?) आणि भाजी जरा जास्तच पांचट झाली, तर जेवणाची मजा गेलीच म्हणून समजा. म्हणूनच असं जर कधी झालं आणि ग्रेव्ही गरजेपेक्षा जास्तच पातळ झाली (What to do if the gravy becomes too thin?), तर या काही सोप्या ट्रिक्स वापरून बघा. ग्रेव्ही तर घट्ट होईलच, पण अधिक चवदारही होईल हे नक्की. (Tips To Make Gravy Thick and Tasty Also)

 

भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी खास ट्रिक्स
१. दही आणि साय

जर तुम्ही एखादी पंजाबी स्टाईल भाजी बनवत असाल तर दही आणि सायीचा वापर करून तुम्ही भाजीची ग्रेव्ही घट्ट करू शकता. तुमच्या भाजीची गरज बघा आणि त्यानुसार दही आणि साय किती प्रमाणात घ्यायचे ते ठरवा. दही आणि साय यांचे प्रमाण सारखेच असावे. दही पाणी काढून टाकलेले अगदी घट्ट चक्का दही असावे. दही आणि साय एका वाटीत घेऊन एकत्र कालवून घ्या. यानंतर भाजीच्या ग्रेव्हीमध्ये हळूहळू मिक्स करा. आता दह्याचा आंबटपणा भाजीला जाणवू शकतो. त्यामुळे त्याप्रमाणात थोडं तिखट आणि मसाला वाढवा आणि भाजीला चांगली उकळी येऊ द्या.

 

२. काजूची पेस्ट 
पनीरची किंवा कमी तिखट असणारी एखादी भाजी करत असाल तर हा उपाय करू शकता. पंजाबी स्टाईल भाजीसाठीही हा उपाय केला तर चालेल. यासाठी काजू दूधात भिजवा. त्यानंतर एका पॅनवर तूप गरम करा. तूप तापलं की त्यात भिजवलेले काजू टाका आणि लालसर होईपर्यंत परतून घ्या. काजू जळणार नाहीत याची काळजी घ्या. त्यासाठी गॅस मंदच असावा. काजू थंड झाले की मिक्सरमधून वाटून घ्या. ही काजूची पेस्ट आता हळूहळू भाजीत टाका आणि भाजीला उकळी येऊ द्या.

 

३. कॉर्न फ्लॉवर
पदार्थ घट्ट करण्यासाठी हा उपाय अगदी सोपा आहे. वांग्याची, कांदा- बटाट्याची अशी कोणतीही पारंपरिक भाजी असेल किंवा मग पंजाबी भाजी असेल तरीही हा उपाय करता येतो. यासाठी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्या. भाजीचा रस्सा किती पातळ आहे आणि तुम्हाला तो किती घट्ट करायचा आहे, यावरून कॉर्नफ्लॉवर किती घ्यायचे ते ठरवा. त्यात थोडा त्याच भाजीचा रस्सा टाका. रस्सा आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित हलवून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट भाजीत हळूहळू मिक्स करा आणि नंतर भाजी चांगली उकळून घ्या. 

 

४. शेंगदाणे आणि कणिक
एरवीही भाजीच्या ग्रेव्हीमध्ये आपण शेंगदाण्याचा कुट घालतोच. आता त्यात थोडी कणिक पण घाला. कणिक आणि दाण्याचा कुट समान प्रमाणात घेऊन पाणी टाकून मिक्स करा. हे मिश्रण भाजीत घाला. भाजी घट्ट होण्याचा वेग नक्कीच वाढेल. 

 

Web Title: Cooking Tips And Tricks: How to make gravy thick? What to do if the gravy becomes too thin?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.