(Image Credit- Social Media, Cookpad)
वांग म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात तर काहीजण असेही आहेत जे वांग्याची भांजी जेवणाला असली की चाटून पुसून खातात. वांग्या-बटाटाची भाजी अनेक घरांमध्ये बनते. त्यापेक्षा वांग्याचं भरीत चवीला खूपच छान असतं, पण परफेक्ट भरीत बनवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. कोणी हिरव्या मिरचीचं तर कोणी लाल तिखट घालून आपापल्या आवडीनुसार भरीत बनवतं. (Cooking Tips)
वांग्याचे भरीत फक्त महाराष्ट्रातच नाही , तर उत्तर भारतातही आवडीनं केला जाणारा पदार्थ आहे. खूप वेगवेगळ्या रीतीने भरीत केलं जातं, पंजाबी बैंगन का भरता ,लाहोरी भरता असे वेगवगेळे प्रकार आहेत. वांग्याचं भरीत ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर उत्तमं लागलं. याबरोबर तुम्ही पापड, कांदा, लोचणं ताटाला लावून मस्त जेवण वाढू शकता. (How To make Baigan Bharta) ही घ्या परफेक्ट वांग्यांच्या भरीताची रेसेपी
साहित्य
२ मोठी जांभळी वांगी
२ ते ३ बारीक चिरलेले कांदे
१ ते बारीक चिरलेलला टोमॅटो
४ ते ५ लसूण बारीक चिरलेले
चवीपुरते मीठ
गरजेपुरता कोथिंबीर
फोडणीकरीता
२ ते ३ टेस्पून तेल,
१ टिस्पून राई,
१ टिस्पून हिंग,
१ टीस्पून हळद,
१ टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या
कृती
- सगळ्यात आधी वांग्यांना तेल लावून गॅसवर भाजून घ्या. वांग व्यवस्थित सगळ्या बाजूनं भाजलं जाईल याची काळजी घ्या. वांगे थांड होऊ द्या. मग साल काढून आतला गर बाजूला काढावा आणि सुरीनं किंवा चमच्याने बारीक करून घ्यावे.
- कढईत तेल गरम करा. त्यात राई, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी घाला. त्यात चिरलेली लसूण घालून १०-१५ सेकंद परतून घ्या. नंतर कांदा घालून मंद आचेवर कांदा लालसर होईपर्यंत लळून घ्या. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला.
- टोमॅटो हलके शिजल्यानंतर मीठ आणि वांगे घालून व्यवस्थित एकजीव करा. व्यवस्थित खालून वर चमच्यानं ढवळा जेणेकरून फोडणी वांग्यात व्यवस्थित एकजीव होईल. नंतर वांग्याना साधालणे ७ ते १० मिनिटं तेल तुटेपर्यंत शिजवा.
- तयार आहे गरमागरम वांग्याचं भरीत. ही डीश तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाण्याचा आनंद घेऊ शकता.
1)
२)
३)