Lokmat Sakhi >Food > महिनाभर टिकणाऱ्या भाज्यांच्या लोणच्याची ही घ्या रेसिपी, ५ टिप्स- भाज्यांचं लोणचं होईल मस्त-टिकेल भरपूर

महिनाभर टिकणाऱ्या भाज्यांच्या लोणच्याची ही घ्या रेसिपी, ५ टिप्स- भाज्यांचं लोणचं होईल मस्त-टिकेल भरपूर

5 Cooking Tips For Tasty, Delicious And Long Lasting Pickle In Winter: हिवाळ्यात केलेलं वेगवेगळ्या भाज्यांचं लोणचं अधिक काळ टिकावं म्हणून या काही टिप्स लक्षात ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2023 09:11 AM2023-12-14T09:11:31+5:302023-12-14T15:26:15+5:30

5 Cooking Tips For Tasty, Delicious And Long Lasting Pickle In Winter: हिवाळ्यात केलेलं वेगवेगळ्या भाज्यांचं लोणचं अधिक काळ टिकावं म्हणून या काही टिप्स लक्षात ठेवा...

Cooking Tips for pickle, 5 TIPS FOR LONG LASTING VEGETABLE PICKLE, How to preserve pickle for long time,5 cooking tips for tasty, delicious and long lasting pickle in winter | महिनाभर टिकणाऱ्या भाज्यांच्या लोणच्याची ही घ्या रेसिपी, ५ टिप्स- भाज्यांचं लोणचं होईल मस्त-टिकेल भरपूर

महिनाभर टिकणाऱ्या भाज्यांच्या लोणच्याची ही घ्या रेसिपी, ५ टिप्स- भाज्यांचं लोणचं होईल मस्त-टिकेल भरपूर

Highlightsलाेणचं किमान महिनाभर तरी टिकावं म्हणून लोणचं घालताना या काही टिप्स लक्षात ठेवा.

हिवाळ्यात खवय्यांची खऱ्या अर्थाने पर्वणी असते. कारण या काळात हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. शिवाय उन्हाळा, पावसाळा या ऋतुंमध्ये भाज्या जास्त टवटवीत, ताज्या मिळतात. पालेभाज्यांसोबतच गाजर, मटार, मुळा असे प्रकारही या दिवसांत भरपूर उपलब्ध असतात. त्यामुळे अनेकजणी मोठ्या हौशीने हिवाळ्यात गाजर, मटार, मुळा, कारले, आवळा अशा भाज्यांचे एकत्रितपणे किंवा वेगवेगळे करून लोणचे घालतात (5 TIPS FOR LONG LASTING VEGETABLE PICKLE). पण एवढा खटाटोप करून घातलेलं लोणचं मात्र जास्त दिवस टिकतच नाही (How to preserve pickle for long time). असं झालं की मग खूपच हिरमोड होतो. म्हणूनच हिवाळी भाज्यांचं लोणचं करताना या काही टिप्स लक्षात ठेवा. लोणचं नक्कीच जास्त दिवस टिकेल. (5 cooking tips for tasty, delicious and long lasting pickle in winter)

 

वेगवेगळ्या भाज्यांचं लोणचं अधिककाळ टिकावं म्हणून टिप्स

गाजर, मुळा, मटार, कांदा या भाज्यांची लोणची मुळातच खूप कमी दिवस टिकतात. आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं वर्ष- दोन वर्ष टिकतं, तसं या भाज्यांच्या लोणच्याचं नसतं.

ड्रेसच्या रंगानुसार लिपस्टिकची शेड कशी निवडायची? बघा ६ टिप्स- दिसाल आणखी सुंदर- आकर्षक

पण काही जणींचं लोणचं अगदी ८ ते १० दिवसांतच खराब होऊन जातं. असं होऊ नये आणि लाेणचं किमान महिनाभर तरी टिकावं म्हणून लोणचं घालताना या काही टिप्स लक्षात ठेवा.

संत्र्यांच्या साली फेकू नका, कुंडीतल्या रोपांसाठी टॉनिक! ४ जबरदस्त फायदे- बघा कसा करायचा वापर

१. गाजर, मुळा, कारलं यांचं लोणचं जेव्हा तुम्ही घालता तेव्हा या भाज्या आपण आधी स्वच्छ धुवून घेतो. भाज्या धुतल्यानंतर त्या पुर्णपणे कोरड्या करून घ्या. भाज्यांमध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर लोणचं लवकर खराब होतं. 

 

२. लोणचं घालताना तुमचे हात किंवा ज्यामध्ये लोणचं घालणार आहात, ते भांडं, चमचा या गोष्टीही पुर्णपणे कोरड्या असाव्या. त्यांच्यामध्ये कुठेही ओलसरपणा नको.

३. भाज्यांचं लोणचं करताना त्यात लिंबू थोडं जास्त पिळा. कारण लिंबू हे नॅचरल प्रिझर्व्हेटीव्ह म्हणून काम करतं आणि त्यामुळे लोणचं जरा जास्त टिकतं.

पॅरिसच्या हॉटेलमध्ये एका महिलेची ६. ७ करोडची अंगठी हरवली आणि चक्क...... पाहा कुठे सापडली

४. या लोणच्यांमध्ये मीठाचं प्रमाण योग्य जमून येणं गरजेचं आहे. लोणचं अधिककाळ टिकण्यासाठी त्यात थोडं जास्त मीठ घाला. मीठ कमी पडलं तर लोणचं बिघडतं.

५. भाज्याचं लोणचं नेहमी एअरटाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवावं. फ्रिजबाहेर ही लोणची अधिककाळ टिकत नाहीत. 
 

Web Title: Cooking Tips for pickle, 5 TIPS FOR LONG LASTING VEGETABLE PICKLE, How to preserve pickle for long time,5 cooking tips for tasty, delicious and long lasting pickle in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.