Lokmat Sakhi >Food > केशर पदार्थात घालताना तुम्हीही हमखास करताय ‘ही’ चूक, महागडं केशर वापरुनही रंग-स्वाद गायब कारण...

केशर पदार्थात घालताना तुम्हीही हमखास करताय ‘ही’ चूक, महागडं केशर वापरुनही रंग-स्वाद गायब कारण...

Cooking Tips For Using Saffron : Correct method of using saffron : how to use saffron or kesar correctly : केशर पदार्थात नेमकं कसं आणि कधी घालावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2024 01:06 PM2024-10-19T13:06:39+5:302024-10-19T13:25:02+5:30

Cooking Tips For Using Saffron : Correct method of using saffron : how to use saffron or kesar correctly : केशर पदार्थात नेमकं कसं आणि कधी घालावं?

Cooking Tips For Using Saffron Correct method of using saffron how to use saffron or kesar correctly | केशर पदार्थात घालताना तुम्हीही हमखास करताय ‘ही’ चूक, महागडं केशर वापरुनही रंग-स्वाद गायब कारण...

केशर पदार्थात घालताना तुम्हीही हमखास करताय ‘ही’ चूक, महागडं केशर वापरुनही रंग-स्वाद गायब कारण...

'केशर' हा मसाल्यांच्या पदार्थांपैकी सर्वात महाग असा एक पदार्थ आहे. त्यामुळे आपण तो अगदी जपून, माेजून- मापून वापरतो. पदार्थांना रुचकर चव आणि सुंदर रंग येण्यासाठी विशेष करुन केशर वापरले जाते. गर्द लालसर, केशरी रंगाच्या केशराच्या काड्या वापरुन आपण पदार्थांना अगदी शाही लूक देऊ देऊ शकतो. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये केशराला मानाचं स्थान देण्यात आलं आहे. बिर्याणी, खीर, गोड मिठाया, शिरा, लस्सी, मसाले दूध, मोदक, रसमलाई अशा अनेक पदार्थांमध्ये आपण आवर्जून केशर घालतोच. साधारणतः कोणताही गोड पदार्थ म्हटलं की त्यात केशर वापरलेच जाते(how to use saffron or kesar correctly).

सध्या दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे गोडाधोडाचे पदार्थ सगळ्यांच्याच घरी अगदी आवडीने केले जातात. हे गोड पदार्थ करताना चवीला चांगले होण्यासाठी तसेच पदार्थांची सजावट करण्यासाठी केशर (best way to use kesar) वापरले जाते. काहीवेळा पदार्थांमध्ये केशर वापरुन सुद्धा पदार्थांना हवी तशी टेस्ट आणि रंग येत नाही. अशावेळी खरंतर पदार्थांमध्ये केशर वापरण्याची पद्धत चुकीची असते. केशर वापरताना आपण शक्यतो ते पदार्थांवर भुरभुरवून घालतो, पण यामुळे पदार्थांची सजावट होऊन ते दिसायला छान दिसतात पण चव येत नाही. जर आपण योग्य पद्धतीने केशरचा वापर केला तरच पदार्थ चवीला आणि दिसायला छान दिसतो. सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी केशर वापरण्याची योग्य पद्धत कोणती याबाबतचा एक व्हिडीओ त्यांच्या masterchefpankajbhadouria या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे(Correct method of using saffron).

गोड पदार्थांमध्ये केशर वापरण्याची योग्य पद्धत... 

बहुतांश घरांमध्ये जेव्हा केशर एखाद्या पदार्थामध्ये घालायचे असते तेव्हा केशराच्या काही काड्या पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत टाकल्या जातात आणि नंतर ते पाणी किंवा दूध त्या पदार्थामध्ये घातले जाते. पण यामुळे पदार्थांना केशराचा म्हणावा तसा सुगंध, चव आणि स्वाद येत नाही. 

मुलांच्या डब्यांत देण्यासाठी पौष्टिक पराठ्यांचे ८ नवीन प्रकार, रोज नवीन हेल्दी खाऊ...

गोड पदार्थांमध्ये केशर वापरताना त्याचा स्वाद आणि रंग दोन्ही अगदी परफेक्ट येण्यासाठी एक सोपी ट्रिक नक्की ट्राय करून पाहा. यासाठी एका टिश्यू पेपरवर बरोबर मधोमध चमचाभर केशर घ्यावे. त्यानंतर त्या टिश्यू पेपरला फोल्ड करत त्याची चौकोनी आकारात घडी घालून घ्यावी. आता गॅसच्या मंद आचेवर एक पॅन ठेवून तो पॅन व्यवस्थित गरम करून घ्यावा. आता या गरम पॅनवर तो घडी केलेला टिश्यू पेपर ठेवून ३ ते ४ सेकंदांसाठी चमच्याने हलका दाब देत गरम करुन घ्यावा. त्यानंतर टिश्यू पेपर उघडून ते केशर खलबत्त्यात घालून ते कुटून त्याची पावडर करुन घ्यावी. आता ही केशर पावडर एका बाऊलमध्ये काढून त्यात थोडेसे गरम पाणी ओतावे. चमच्याच्या मदतीने थोडेसे हलवून घ्यावे. अशा पद्धतीने तयार झालेले केशर आपण कोणत्याही गोड पदार्थांत घालू शकता. यामुळे हे केशर पदार्थात अगदी सहजपणे मिसळते यामुळे पदार्था खाताना केशरची चव लागते, सोबतच पदार्थांना रंगही खूप छान येतो. यामुळे पदार्थांवर केशर वरुन भुरभुरवून घालण्यापेक्षा अशा वेगळ्या पद्धतीने घालावे.

कोबीची भाजी न आवडणारेही मिटक्या मारुन खातील ‘कोबीचा चिला’, धिरड्याचाच चमचमीत प्रकार-पाहा रेसिपी...


Web Title: Cooking Tips For Using Saffron Correct method of using saffron how to use saffron or kesar correctly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.