Join us  

थंड झालेला भात मायक्रोवेव्ह न वापरता गरम करण्याची सोपी ट्रिक- १ मिनिटात गरमागरम वाफाळता भात तयार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2023 12:33 PM

Easy Trick To Reheat Cold Rice: मायक्रोवेव्ह नसेल तर थंड झालेला भात पुन्हा गरम करणं बऱ्याचदा अवघड जातं. म्हणूनच ही एक सोपी ट्रिक एकदा पाहून घ्या. थंड भात गरम करण्याचं आता टेन्शनच नाही.  (How to reheat cold rice without using microwave)

ठळक मुद्देसोप्यात सोप्या पद्धतीने थंड भात गरम कसा करायचा ते पाहून घ्या. पाहूणे घरी आल्यावर ही ट्रिक खूप उपयुक्त ठरू शकते. 

आता बऱ्याच घरांमध्ये मायक्रोवेव्ह असतं. त्यामुळे पदार्थ त्यात टाकून गरम करणं आता अगदी सोपं झालं आहे. पण मायक्रोवेव्हचा अतिरिक्त वापर करणं अनेक जण टाळतात. किंवा मग कधी कधी लाईट नसते. अशावेळी मायक्रोवेव्ह वापरता येत नाही. किंवा मग अनेक घरांमध्ये मायक्रोवेव्हच नसतो. अशावेळी मग थंड झालेला भात गरम करणं जरा अवघड होतं (Hack to Reheat Cold Rice). कारण इतरवेळी भाजी, वरण गरम करताना आपण ते पातेले किंवा कढई थेट गॅसवर ठेवून गरम करतो (How to reheat cold rice without using microwave). पण भाताचा डबा काही आपण थेट गॅसवर ठेवून गरम करू शकत नाही (easy trick to reheat cold rice). 

 

अनेक जणी थंड भात गरम करून खायचा असेल तर भाताचा डबा कुकरमध्ये ठेवतात. कुकरमध्ये पाणी टाकून ते गॅसवर गरम करायला ठेवलं जातं. पण असं करण्यात वेळही खूप जातो आणि कुटाणाही भरपूर असतो.

करिना कपूर ते खुशी कपूर... आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणी आईचे- सासूचे कपडे घालणाऱ्या ६ सेलिब्रिटी..

त्यामुळे मग बऱ्याचदा आपण थंड भात गरम करून खाण्याचा प्लॅन डोक्यातून काढून टाकतो. म्हणूनच आता सोप्यात सोप्या पद्धतीने थंड भात गरम कसा करायचा ते पाहून घ्या. पाहूणे घरी आल्यावर ही ट्रिक खूप उपयुक्त ठरू शकते. 

 

मायक्रोवेव्ह न वापरता थंड भात गरम करण्याची सोपी पद्धत

थंड झालेला भात मायक्रोवेव्ह किंवा कुकर न वापरता पुन्हा गरम कसा करायचा, याची सोपी पद्धत mommywithatwist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

नेलपेंट लावली की एक- दोन दिवसांतच निघू लागते, १ सोपा उपाय- आठवडाभर नेलपेंट राहील जशास तशी...

यासाठी सगळ्यात आधी एका चाळणीत भात काढून घ्या. पदार्थ तळण्यासाठी जो मोठा खोलगट झाऱ्या असतो, तो वापरला तरी चालेल.

यानंतर गॅसवर पाणी उकळून घ्या. उकळलेलं पाणी चाळणीत काढलेल्या थंड भातावर थोडं थोडं करून ओता. असं करताना भात हलवत राहा. यानंतर १० ते १५ सेकंदासाठी चाळणीवर झाकण ठेवा. गरमागरम वाफाळता भात तयार...

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती