Join us  

Cooking Tips : मळलेल्या पीठाचा गोळा लगेच काळा पडतो? कणीक जास्तवेळ फ्रेश राहण्यासाठी 'या' ६ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 9:52 AM

Cooking Tips : चपातीचं पीठ मळताना त्यात जास्त पाणी घालू नये. असं केल्याने ते खराब होऊ शकते. मळताना नेहमी थोडे थोडे पाणी घालावे. जर पीठ खूप मोकळे झाले असेल तर त्यात थोडे कोरडे पीठ घाला आणि व्यवस्थित एकजीव करा.

संपूर्ण भारतात गव्हाच्या चपात्या खाल्ल्या जातात. गोल आणि मऊ रोट्या/चपात्या वेगवेगळ्या भाज्या आणि डाळींसोबत खाल्ल्या जातात. गव्हाचे पीठ, पाणी आणि तेल वापरून चपातीसाठी (Perfect Chapati) कणीक तयार केले जाते. नंतर लाटणी वापरून गोलाकार चपाती लाटली जाते आणि लोखंडी तव्यावर शिजवले जाते. बहुतेक स्त्रिया मऊ आणि फुगलेल्या चपात्या बनवतात. पण अनेक स्त्रिया तक्रार करतात की त्यांचे पीठ थोड्या वेळाने घट्ट होते, ज्यामुळे चपात्या कडक होतात.  जेव्हा चपात्यांचा विचार केला जातो तेव्हा गव्हाचं पीठ महत्त्वाची भूमिका बजावते. पीठ परफेक्ट नसेल तर मऊ चपाती कधीच बनणार नाही. म्हणून आम्ही तुम्हाला मऊ, लुसलुशीत, फुगलेल्या चपात्या बनवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. (How to make perfect chapati)

पीठ मळताना जास्त पाणी वापरू नका

चपातीचं पीठ मळताना त्यात जास्त पाणी घालू नये. असं केल्याने ते खराब होऊ शकते. मळताना नेहमी थोडे थोडे पाणी घालावे. जर पीठ खूप मोकळे झाले असेल तर त्यात थोडे कोरडे पीठ घाला आणि व्यवस्थित एकजीव करा.

पीठ मळताना तेलाचा वापर

चपातीचे पीठ मळताना कणकेत थोडे तेल किंवा तूप घाला. तेल किंवा तूप चपाती जास्त  वेळ मऊ ठेवण्यास मदत करेल.

ये वेगन ‘वेगन’ क्या है? ही वेगन लाइफस्टाइल नक्की आली कुठून?

कोमट पाण्याचा वापर

पीठ मऊ होण्यासाठी पिठात कोमट पाणी किंवा दूध घाला. 10-15 मिनिटे मऊ गव्हाचे पीठ चांगले मळून घ्या.  थंड पाण्याचा वापर केल्याने पीठ घट्ट होऊ शकते आणि चपात्या बनवणे कठीण होऊ शकते.

हवाबंद डब्याचा वापर

मळलेले पीठ फ्रीजमध्ये कधीही उघडे ठेवू नये, अन्यथा ते खराब होईल. पीठ हवाबंद डब्यात साठवा. पिठात गव्हाचे जिवाणू असल्यामुळे पीठ खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जास्त काळ साठवण्यासाठी ते हवाबंद डब्यात ठेवणे महत्त्वाचे आहे.

मळलेल्या पीठासाठी तूप किंवा तेलाचा वापर

पीठ खराब होऊ नये म्हणून त्यावर तूप किंवा तेलाचा पातळ थर लावून फ्रीजमध्ये ठेवा. पीठ गुळगुळीत केल्याने ते कोरडे किंवा काळे होणार नाही. या टिप्स वापरल्यास, तुम्हाला प्रत्येक वेळी मऊ आणि ताज्या चपात्या मिळतील.

प्लॅस्टिक रॅप किंवा एल्यूमिनियम फॉईल

प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पीठ वापरण्यासाठी बाहेर काढता तेव्हा ते हवाबंद डब्यात ठेवा आणि प्लास्टिकच्या आवरणाने किंवा अॅल्युमिनियम फॉइलने झाकून ठेवा. लक्षात ठेवा की सामान्य पीठ घट्ट बंद प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवल्यास त्याचे शेल्फ लाइफ 6 महिने असते. रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजरमध्ये सीलबंद कंटेनरमध्ये पीठ साठवणे चांगली कल्पना आहे.

शुगर फ्री पदार्थ असं खरंच काही असतं का? दिवाळीत शुगर फ्री खाण्यापूर्वी बघा डॉक्टर काय म्हणतात..

तज्ज्ञ काय सांगतात?

बरेच आरोग्य तज्ञ म्हणतात की पीठ जास्त काळ वापरणे आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक असू शकते. पीठ मळून घेतल्यानंतर लगेच वापरण्यासाठी वापरणे चांगले. ते दीर्घकाळ ठेवल्याने हानिकारक पदार्थ त्यात तयार होऊ शकतात ज्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स