आपण सणासुदीलाच पुऱ्या करतो असं काही नाही. कधी कधी पाहूणे जेवायला येणार असतील तर किंवा कधी आपण कुठे पिकनिकला, डबा पार्टीला जाणार असू तर बटाट्याची भाजी आणि पुरी (aloo sabji and puri) असा बेत हमखास केला जातो. किंवा लहान मुलांना तर शाळेच्या डब्यात कधीही पुरी- भाजी दिली तर आनंदच असतो. अशी ही सगळ्यांना आवडणारी पुरी जेव्हा टम्म फुगत नाही, वातड होऊन बसते, तेव्हा जेवणाचा सगळा मुडच जातो. म्हणूनच तर मस्त गुबगुबीत फुगलेली पुरी करण्याचा हा बघा एक परफेक्ट फॉर्म्युला (How to make perfect puri?). ही रेसिपी कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्रामला शेअर केली आहे.
पुऱ्या करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी
१. कणिक कशी भिजवायची?
पुऱ्यांसाठी कणिक भिजवताना ती सगळ्यात आधी चाळून घ्या. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत कणिक भिजवा. कणिक अतिघट्ट किंवा रोजच्या पोळ्यांना जशी भिजवतो तशी मऊसर भिजवू नका. थोडी घट्ट भिजवा. भिजवल्यानंतर तिच्यावर एखादा ओलसर कपडा टाका आणि ५ ते १० मिनिटे ती भिजू द्या.
फोटो चांगला येतच नाही? ५ भन्नाट ट्रिक्स.. एडिट न करताही फोटोमध्ये दिसाल सुंदर- आकर्षक
२. कणिक भिजल्यानंतर
५ ते १० मिनिटे कणिक छान भिजली की ती पुन्हा एकदा ३ ते ४ मिनिटे चांगली मळून घ्या. यानंतर कणकेचे छोटे- छोटे गोळे करा. या गोळ्यांवर कुठेही जाडेभरडेपणा आलेला नसेल, हे बघा. पुऱ्यांसाठी केलेले गोळे अगदी मऊसर, प्लेन असावेत.
३. कणकेऐवजी तेलाचा वापर
पुऱ्याांसाठी केलेले सगळे गोळे एका भांड्यात ठेवा. प्रत्येकावर थेंब- दोन थेंब तेल टाका आणि तेलात हे सगळेच गोळे चांगले घोळवून घ्या. पुऱ्या लाटताना तेलाचाच वापर करा. कणकेचा नको. तसेच लाटणं आणि पोळपाट यावरही तेल लावून घ्या. तेल लावण्यापुर्वी लाटणे चाकूने खरवडून घ्या.
४. पुरी तळताना
तेल चांगले तापलेले असावे. पुरी मध्यम आचेवर तळावी. खालच्या बाजूने पुरी तळली जात असताना वरच्या बाजूने त्यावर तेल सोडावे.