Lokmat Sakhi >Food > मेदू वड्याला मधोमध छिद्र पाडण्याच्या २ सोप्या ट्रिक्स; वडा होईल परफेक्ट हॉटेलसारखा

मेदू वड्याला मधोमध छिद्र पाडण्याच्या २ सोप्या ट्रिक्स; वडा होईल परफेक्ट हॉटेलसारखा

Cooking Tips How To Make Perfect Medu Vada : घरीच्याघरी विकतसारखा गोल, गरगरीत मेदू वडा करणं काही अवघड काम नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 07:10 PM2024-09-26T19:10:00+5:302024-09-26T19:12:46+5:30

Cooking Tips How To Make Perfect Medu Vada : घरीच्याघरी विकतसारखा गोल, गरगरीत मेदू वडा करणं काही अवघड काम नाही.

Cooking Tips How To Make Round Hole In Middle Medu vada Learn This Easy Method | मेदू वड्याला मधोमध छिद्र पाडण्याच्या २ सोप्या ट्रिक्स; वडा होईल परफेक्ट हॉटेलसारखा

मेदू वड्याला मधोमध छिद्र पाडण्याच्या २ सोप्या ट्रिक्स; वडा होईल परफेक्ट हॉटेलसारखा

साऊथ इंडीयामध्ये (South India) डोसा, इडली व्यतिरिक्त मेदू वडा हे पदार्थ खूपच प्रसिद् आहेत. तुम्ही नाश्त्याला हे पदार्थ आवर्जून खात असाल. अनेकांना मेदू वडा खायला खूपच आवडतो. (Cooking Hacks)  मेदू वडा घरी बनवणं सोपं आहे. घरीच्याघरी विकतसारखा गोल, गरगरीत मेदू वडा करणं काही अवघड काम नाही. (How To Make Perfect Medu Vada)

डाळ भिजवण्यापासून डाळ वाटण्यापर्यंत सर्व स्टेप्स सोप्या वाटतात, पण जेव्हा मेदू वड्याला शेप द्यायचा असतो तेव्हा गणित चुकतं मेदू वड्याला परफेक्ट शेपच देता येत नाही. काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही मेदू वड्याला शेप देऊ शकता आणि मधोमध छिद्रही पाडू शकता. (Meduvada Making Tips) 

पॉलिथिनचा वापर करा

वडा तळण्यासाठी तेल ठेवल्यानंतर प्लास्टीकचे ग्लोव्हज हातात घाला. नंतर यावर पाणी किंवा तेल घालून वड्याचं पीठ लावा नंतर दुसऱ्या हाताचे बोट ओलं करून मधोमध छिद्र करा. नंतर सावधगिरीनं वडा तेलात घाला. एकत्र ३ ते ४ वडे तुम्ही तळू शकता. 

चहाची गाळणी

चहाच्या गाळणीच्या मदतीने तुम्ही वड्याला परफेक्ट आकार देऊ शकता. यासाठी एक गाळणी घ्या ती ओली करून घ्या, नंतर उलट्या बाजूनं वड्याचं मिश्रण घालून त्याला मध्ये छिद्र पाहा आणि गाळणी सरळ करून तेलात पलटी करा.  यामुळे हात जळण्याची शक्यता कमी होते आणि शेपही चांगला येतो.

वडा बनवताना हात नेहमी ओला करून घ्या ज्यामळे वडा तेलात व्यवस्थित स्लिप होईल. वडा सुरूवातीला मध्यम आचेवर शिजवा नंतर आज उच्च ठेवा. ज्यामुळे बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूंनी वडा शिजेल. वड्याचे मिश्रण नेहमी जाड असेल तर असं पाहा किंवा ते फेटलेलं असावं. वड्यांसाठी डाळ दळताना कमीत कमी पाण्याचा वापर करा.

Web Title: Cooking Tips How To Make Round Hole In Middle Medu vada Learn This Easy Method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.