Join us  

कारल्याचा कडवटपणा घालण्यासाठी ६ टिप्स; लहान मुलंही आवडीनं खातील कारल्याची भाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 1:06 PM

Cooking Tips : कारल्याचा कडूपणा त्यांच्या बियांमध्ये सर्वाधिक असतो. त्यामुळे त्याचा कडूपणा कमी करायचा असेल तर बिया काढून शिजवा.

कारल्याचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. पण फक्त खायला कडू आहे म्हणून फक्त लहान मुलंच नाही तर मोठी मंडळीही कारलं खाणं टाळतात. कडूपणामुळे, कारले अनेकांच्या आवडत्या खाद्यपदार्थांच्या यादीतून बाहेर पडतो. कारले चवीला कडू असले तरी त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा केवळ चमकत नाही तर रक्तातील साखर नियंत्रणात राहते. (Cooking tips how to remove bitterness from karela tips to reduce bitternes of karela)

पण जर तुमच्या घरातील लोकांनी कारल्याच्या गुणधर्माचा फायदा घ्यावा आणि ते चवीने खावे असे वाटत असेल तर तुम्ही त्याचा कडूपणा दूर करण्याचा प्रयत्न करू शकता. अशाच काही टिप्स ज्यांच्या मदतीने  कारल्याचा कडूपणा घालवता येईल आणि त्यातील पोषक तत्वांचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. (Cooking Hacks) या टिप्स वापरून कारल्याची भाजी बनवली तर लहान मुलंही आवडीनं खातील. 

कारल्याचा कडवटपणा कसा दूर करायचा? (Easy Tips To Remove Bitterness From Karela Or Bitter Gourd)

1)  कारल्याचा कडूपणा त्यांच्या बियांमध्ये सर्वाधिक असतो. त्यामुळे त्याचा कडूपणा कमी करायचा असेल तर बिया काढून शिजवा. रस बनवताना बिया काढल्यानंतर कारल्याचा वापर करा त्यामुळे त्याला कडू चव लागणार नाही किंवा खूप कमी लागेल.

2) मीठ कारल्याचा कडूपणा पूर्णपणे काढून टाकू शकते. किंबहुना, मिठातील खनिजे कारल्याचा कडू रस काढून टाकतात. कारल्याला मीठ लावून २०-३० मिनिटे ठेवा. असे केल्याने सर्व कडू रस बाहेर येईल. याशिवाय कारले सोलून शिजवून घ्या. यामुळे अधिक कडूपणा जाणवणार नाही.

3) कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी तुम्ही दही देखील वापरू शकता. यासाठी कारल्याचे छोटे तुकडे करून तासभर दह्यात ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे दही भाजीमध्ये वापरू शकता.

स्वयंपाक करताना, कुकर लावताना डाळी धुण्याची -भिजत घालण्याची योग्य पद्धत; ४ कुकिंग टिप्स

4) कारल्याला तळून घेतल्यानेही कडवटपणा दूर होतो.

5) कारल्याचे छोटे तुकडे करून तांदळाच्या पाण्यात ठेवा. या पाण्यात किमान अर्धा तास भिजवून ठेवा. असे केल्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो.

६) कारल्याचा कडूपणा दूर करायचा असेल तर त्यात साखर किंवा गूळही टाकता येईल.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स