Join us  

पुऱ्या खूप तेल पितात? पुऱ्याचं पीठ भिजवताना लक्षात ठेवा १ ट्रिक, कमी तेलात टम्म फुगतील पुऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:59 PM

Cooking Tips Oil Less Puri Making Tips :

गरमागरम पुरी भाजी  (Puri Bhaji) खायला सर्वांनाच आवडते. आधी सणासुधीच्या दिवशी प्रत्येकाच्याच घरी पुरी-भाजी बनायची. आजकाल वेट कंट्रोलसाठी लोकांनी डाएटवर लक्ष द्यायला सुरूवात केली आहे म्हणून पुऱ्या खाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. कारण पुऱ्या डिप फ्राईड असतात. (How To Make Perfect Puri) पुऱ्यासोबत भरपूर तेल शरीरात जाते, जास्त तेल असलेल्या पुऱ्या बेचव लागतात. पुऱ्यांनी जास्त तेल पिऊ नये यासाठी तुम्ही खास ट्रिक्स वापरू शकता. या ट्रिक्सच्या मदतीने पुऱ्या तळणं अधिक सोपं होईल आणि पुऱ्या टम्म फुललेल्या, मऊ होतील. (Puri  Making Tips & Tricks)

पुऱ्या करताना तुम्ही पुऱ्या तेलकट होतील याची चिंता करणंच सोडून द्या. सगळ्यात आधी पीठ मळून  घ्या. नंतर पीठाचे छोटे छोटे गोळे बनवा. त्यानंतर हे गोळे पुरीच्या आकारात लाटून घ्या किंवा एक मोठी चपाती लाटून वाटीच्या साहाय्याने पुऱ्यांचा आकार द्या.

पोट खूपच सुटलंय? ५०० वर्षांपूर्वी ऋषी चरक यांनी सुचवलेला खास उपाय करा, भराभर वितळेल चरबी

नंतर एका प्लेटमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. जवळपास १० ते १५ मिनिटांनतर पुऱ्यांची प्लेट फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा.  २ मिनिटं वाट पाहिल्यानंतर  गरम तेलात पुऱ्या तळून घ्या. ही पद्धत फॉलो केल्यानंतर तुम्ही कमी तेलात  पुऱ्या तळून होतील. ही पद्धत फॉलो केल्यानं कमी तेलात पुऱ्या तळून  होतील आणि कमी तेल पितील, पुऱ्या जास्त मऊ बनतील.

मऊ, मुलायम पुरी बनवण्यासाठी ही ट्रिक वापरा

काही लोक तक्रार करतात की पुऱ्या तळल्यानंतर खूपच कडक होता. जर तुम्हाला मऊ, फुललेल्या पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही काही ट्रिक्स फॉलो करू शकता. सगळ्यात आधी एका भांड्यात पीठ घ्या. या पीठाला थोडसं तेलं आणि थोडं दही घालून मळून घ्या.

नंतर हलक्या हातानं दही आणि तेल एकजीव करून पीठ मळून घ्या. हलकं गरम पाणी घालून पीठ मळून घ्या. यात तुम्ही मैदा मिसळू शकता. जेणेकरून पुरी छान फुगते पुरीचं पीठ नेहमीच घट्ट असायला हवं.  कमीत कमी १५ मिनटांनी  गोळे तोडून तेल लावून पुऱ्या लाटून घ्या. लाटल्यानंतर कढईत घालून उच्च आचेवर पुऱ्या तळून घ्या. या पद्धतीनं पुऱ्या केल्यास चवदार आणि परफेक्ट होतील.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स